Join us

मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादमध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणारी ही क्युट चिमुकली आहे प्रसिद्ध कलाकाराची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:21 IST

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच कलाकार आहेत ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. अवनी सुद्धा त्यापैकीच एक आहे.

स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. छोट्या उस्तादांचा आत्मविश्वास आणि उत्साह जजेसनाही थक्क करुन टाकतो आहे. बच्चेकंपनीच्या या सुरेल मैफलीचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी करतायेत. तर या कार्यक्रमाचे परिक्षण सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे करतायेत.

 सिद्धार्थसोबत सूत्रसंचालन करणाऱ्या अवनी जोशीचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. तिने आपल्या निरागसपणामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अवनीने याआधी स्टार प्रवाहवरील साथ दे तू मला या मालिकेतून अवनीने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. अवनीला गायनाची देखील आवड आहे. 

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच कलाकार आहेत ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. अवनी सुद्धा त्यापैकीच एक आहे. अवनीसा गायनाचे धडे तिच्या घरातूनच मिळाले आहेत. अवनी गायक अनिरुद्ध जोशीची मुलगी आहे. अनिरुद्ध झी टीव्हीवरील आयडिया सारेगमप या शोचा  तसेच सूर नवा ध्यास नवा ह्या शोचा विजेता आहे. अवनीची आई रसिका जोशीसुद्धा गाते.   वेगवेगळ्या म्युजिक अल्बम मधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

 

टॅग्स :स्टार प्रवाहसेलिब्रिटी