Join us  

'देवमाणूस' मालिकेतला विजय शिंदे 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात, सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 9:00 AM

एकनाथ गीते 'देवमाणूस २' मध्येही झळकणार आहे. पुन्हा एकदा तो डॉक्टरच्या विरोधात कशा प्रकारे त्याची भूमिका असणार, डॉक्टरला पकडून देण्यात तो कशी मदत करणार हे पाहणे रंजक असणार आहे.

'देवमाणूस' मालिकेच्या पहिल्या भागाचा शेवट झाला तेव्हापासूनच मालिकेच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली होती. कारण मालिकेचा शेवट दाखवण्यातच आला नव्हता. त्यामुळे आता चाहत्यांच्या पडलेल्या प्रश्नांचे उत्तरही मालिकेच्या दुसऱ्या भागातून उलगडतील. त्यामुळे रसिकांनाही या मालिकेचा दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता आहे. मालिका सुरु होण्याआधी सध्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. मालिकेच्या पहिल्या भागातल्या कलाकारांचीही चर्चा रंगत आहे.पहिल्या भागात झळकलेल्या कलाकारांना आपली एक वेगळी ओळख मिळाली होती.या मालिकेत विजय शिंदे ही व्यक्तीरेखा  साकारणारा अभिनेता एकनाथ गीतेलासुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 

याच मालिकेतून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला होता. या मालिकेआधी त्याने 'तू अशी जवळी रहा', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'जागते रहो महाराष्ट्र', 'श्री गुरुदेव दत्त', 'देव पावला', 'घेतला वसा टाकू नको' अशा मालिकेतही काम केले आहे. मालिकाच नाही तर 'तांडव' सिनेमातूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता.आता तो चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहेत त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो. फोटोवरुन तो प्रेमात असल्याचे स्पष्ट होते. एकनाथ गीते हा मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे.ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे.अभिनेत्री त्रिशा कमलाकरच्या तो प्रेमात आहे. 

इतकंच काय तर दोघांनीही सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली आहे. दोघेही सतत एकमेकांसह फोटो शेअर करताना दिसतात. एकमेकांसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.२०१८ पासून दोघांचे अफेअर सुरु आहे.दोघांचे फोटो पाहून चाहत्यांनी देखील त्यांना लग्नबंधनात अडकण्याचे सांगत आहेत. 

दोघांमध्ये असणारी केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरली असून दोघेही आवडते कपल बनले आहेत. एकनाथ गीते 'देवमाणूस २' मध्येही झळकणार आहे. पुन्हा एकदा तो डॉक्टरच्या विरोधात कशा प्रकारे त्याची भूमिका असणार, डॉक्टरला पकडून देण्यात तो कशी मदत करणार हे पाहणे रंजक असणार आहे. 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 'देवमाणूस २' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.