Join us  

समथिंग इज कुकिंग...! ‘देवमाणूस’मधील देवीसिंग आता दिसणार फौजीच्या भूमिकेत?  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 2:50 PM

मालिकेत किरणने खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

ठळक मुद्दे कॉलेज जीवनापासूनच त्याला नाटकांत काम करण्याची आवड होती. त्यानुसार तो एका नाटक ग्रुपमध्ये काम करू लागला. त्यानंतर त्याला 2017 साली ‘लागीर झालं जी’ या झी मराठी वरील मालिकेत भैयासाहेब हे पात्र साकारण्याची संधी मिळाली.

झी मराठी वाहिनीवरील प्रचंड गाजलेल्या ‘देवमाणूस’  (Devmanus) या मालिकेने नुकताच निरोप घेतला. मालिकेला निरोप देताना यातील सर्व कलाकार भावुक झाले होते. मालिकेतील ‘देवीसिंग’ अर्थात अजित कुमार देवची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडही (Kiran Gaikwad) भावुक झाला होता. किरणने मालिकेत निगेटीव्ह भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. आता काय तर किरण एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. यात किरण एका फौजीची भूमिका साकारताना दिसणार असल्याचं कळतंय.

‘देवमाणूस’ ही मालिका संपल्यानंतर किरणने काही रील्स व्हिडीओ शेअर केले होते. ज्यात तो सुट्ट्या एन्जॉय करताना दिसला होता. याशिवाय त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी देखील शेअर केली आहे. ज्यात तो फौजी वेशात दिसत आहे. ‘समथिंग इज कुकींग’ असं कॅप्शनही त्याने या स्टोरीला दिलं आहे. यावरून किरण नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्याचं मानलं जातंय. अर्थात त्याचा हा नवा प्रोजेक्ट नेमका काय आहे,  हा चित्रपट आहे की मालिका हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

किरणचा जन्म 12 जून रोजी पुण्यात झाला होता. त्याचं बालपणही पुण्यातच गेलं. किरणचं शिक्षणही पुण्यातच झालं. यशवंतराव मोहीते कॉलेजमधून त्याने पदवी शिक्षण घेतलं होतं. किरण महिंद्रा कंपनीत नोकरीही करत होता. आजारी असल्यामुळे त्याने नोकरी सोडली होती.

 कॉलेज जीवनापासूनच त्याला नाटकांत काम करण्याची आवड होती. त्यानुसार तो एका नाटक ग्रुपमध्ये काम करू लागला. त्यानंतर त्याला 2017 साली ‘लागीर झालं जी’ या झी मराठी वरील मालिकेत भैयासाहेब हे पात्र साकारण्याची संधी मिळाली.  2020 मध्ये किरणला अजितकुमार देव हे मुख्य पात्र साकरण्याची संधी मिळाली.

टॅग्स :किरण गायकवाड