Join us

दिव्यांका त्रिपाठीने एअरलाइन्स कंपनीला सुनावले खडेबोल; पण का? वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 20:14 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं मोहब्बतें’मधील इशिता अर्थात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने एका प्रसिद्ध एअरलाइन कंपनीला चांगलेच खडसावले ...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं मोहब्बतें’मधील इशिता अर्थात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने एका प्रसिद्ध एअरलाइन कंपनीला चांगलेच खडसावले आहे. वास्तविक दिव्यांकाचा पारा तेव्हा चढला जेव्हा एअरलाइन्स कंपनीचा गलथान कारभार समोर आला. दिव्यांका तिचा सर्व राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला. त्याचे झाले असे की, कोलकाता ते मुंबई प्रवास केल्यानंतर दिव्यांकाला एअरलाइन्सकडून सांगण्यात आले की, तिचे लगेज कोलकाता येथेच ठेवण्यात आले आहे. जेव्हा ही बाब दिव्यांकाला सांगितली तेव्हा ती अशी संतापली की, तिने ट्विटच्या माध्यमातून एअरलाइन्स कंपनीचे चांगलेच वाभाडे काढले. दिव्यांकाने लिहिले की, ‘एअरलाइन्स कंपनीच्या गलथान कारभाराने कळस गाठला आहे. माझे लगेज कोलकाता येथेच सोडून दिले अन् मला केलेल्या चुकीची माफी मागण्याचीदेखील तसदी घेतली नाही. अर्ध्यातासानंतर दिव्यांकाने पुन्हा एक ट्विट केले. त्यामध्ये लिहिले की, ‘आम्ही गेल्या अर्ध्यातासापासून मुर्खासारखी लगेजची प्रतीक्षा करीत होतो. पॅसेंजरच्या वेळेचे काहीही महत्त्व नाही.’ दिव्यांकाने केलेल्या या दोन्ही ट्विटमध्ये तिचा संताप स्पष्टपणे दिसून येतो. दरम्यान, दिव्यांका पहिलीच सेलिब्रिटी नाही की, तिला एअरलाइन्स कंपनीच्या गलथान कारभाराचा सामना करावा लागला. यापूर्वीदेखील बºयाचशा सेलिब्रिटींना अशाप्रकारचा सामना करावा लागला.  दिव्यांका तिच्या पतीसोबत कोलकाता येथे सुट्या एन्जॉय करायला गेली होती. दिव्यांकाने ट्विट करून सांगितले की, एअरलाइनच्या चुकीमुळे केवळ मलाच त्रास झाला असे नाही तर संपूर्ण शूटिंग क्रूला याबाबतचा त्रास सहन करावा लागला. एका ट्विटमध्ये दिव्यांकाने लिहिले की, ‘शंभर लोक सेटवर प्रतीक्षा करीत होते. अत्यावश्यक साहित्याविनाच सेटवर यावे लागले. एअरलाइन्स कंपनीला याबाबतचे भान असायला हवे की, आमच्या वेळेचे किती महत्त्व आहे.