'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रांवर लोकांनी भरभरून प्रेम केले आहे, अगदी जे कलाकार मालिका सोडून गेले त्यांच्यावरही. या मालिकेत 'दयाबेन'ची भूमिका साकारून दिशा वकानी घराघरात पोहोचली. आई झाल्यानंतर दिशा वकानीने मालिका सोडली होती. आता दिशा दोन मुलांची आई बनली आहे, पण तिने अजूनही मालिकेत कमबॅक केलेले नाही. आता तिने मातृत्वाच्या प्रवासाविषयी मोकळेपणाने सांगितले आहे.
गेल्या ८ वर्षांपासून दिशा वकानी मालिकाविश्वापासून दूर आहे. आता तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना सांगितले आहे की, ती धर्ममार्गावर वळली आहे. त्यामुळे आता ती छोट्या पडद्यावर परतण्याची शक्यता कमी आहे. दिशाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती तिच्या प्रसूतीच्या अनुभवाविषयी बोलताना दिसत आहे.
''तर गर्भात असलेले बाळ घाबरून जाईल...''
दिशा वकानी सांगते, ''मी त्यावेळी खूप घाबरले होते. मी जेव्हा पालकत्वाचा कोर्स करत होते, तेव्हा कोणीतरी मला सांगितले होते की तुम्ही आई आहात पण तुम्हाला ओरडायचे नाहीये. तुम्ही ओरडाल तर गर्भात असलेले बाळ घाबरून जाईल. मी मनात विचार करत होते की, वेदना झाल्या तर ओरडणारच कारण शूटिंग लाइनमध्ये ऐकले होते की प्रसूतीमध्ये जीव जातो. मग मी विचार केला की काय करू? तेव्हा मी गायत्री मंत्राचा जप सुरू केला. मी हसत-हसत प्रसूती केली. मी मनात गायत्री मातेचे स्मरण केले होते.''
''तुम्हाला जी शक्ती मिळेल...'' दिशा पुढे म्हणाली, ''मी डोळे बंद करून हसत राहिले आणि माझ्या स्तुती नावाच्या मुलीचा जन्म झाला. जो चमत्कार मला अनुभवता आला, तो मी प्रत्येक गर्भवती आईला सांगते की तुम्ही हा मंत्र सतत जपत राहा, तुम्हाला जी शक्ती मिळेल... तो चमत्कार तुम्हाला दिसेल आणि तो खूप लक्षात राहील. त्यामुळे या जगात हिंदू सनातनमध्ये जी मुले येतात, त्यांना गायत्री मातेचा मंत्र आपोआपच येतो.''
Web Summary : Disha Vakani, famed as 'Dayaben,' hasn't returned to 'Taarak Mehta.' She revealed her childbirth experience, emphasizing Gayatri mantra's power during labor. She encourages expectant mothers to chant for strength and a miraculous experience.
Web Summary : 'दयाबेन' के रूप में प्रसिद्ध दिशा वकानी 'तारक मेहता' में नहीं लौटीं। उन्होंने अपने प्रसव का अनुभव बताया, प्रसव के दौरान गायत्री मंत्र की शक्ति पर जोर दिया। वह गर्भवती माताओं को शक्ति और एक चमत्कारी अनुभव के लिए जाप करने के लिए प्रोत्साहित करती हैं।