या दिवशी होणार आक्षका गोराडिया आणि ब्रेंट गोबलचे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:18 IST
आक्षका गोराडिया आणि तिचा प्रियकर ब्रेंट गोबलने गेल्या वर्षी साखरपुडा केला होता. तेव्हापासून ते दोघे लग्न कधी करणार याची ...
या दिवशी होणार आक्षका गोराडिया आणि ब्रेंट गोबलचे लग्न
आक्षका गोराडिया आणि तिचा प्रियकर ब्रेंट गोबलने गेल्या वर्षी साखरपुडा केला होता. तेव्हापासून ते दोघे लग्न कधी करणार याची चर्चा मीडियात चांगलीच रंगली होती. आता लवकरच ते लग्न करणार असून त्यांनी लग्न करण्यासाठी अहमदाबाद या शहराची निवड केली असल्याचे खुद्द आक्षकाने मीडियाला सांगितले आहे. त्यांचे लग्न तीन डिसेंबरला होणार असून त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील छापली गेली आहे. लग्नाचे कार्यक्रम तीन दिवस असणार आहेत. एक डिसेंबरला ते ख्रिश्चन पद्धतीने विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत आणि मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे. तीन डिसेंबरला भारतीय परंपरेनुसार, रितीरिवाजानुसार ते लग्न करणार आहेत. आक्षका आणि ब्रेंट यांना भारतीय परंपरेनुसार, रितीरिवाजानुसार लग्न करायचे आहे. त्यामुळे भारतातील एखाद्या शहरातच लग्न करायचे असे त्यांच्या डोक्यात कित्येक दिवसांपासून सुरू होते. अनेक शहरांचा विचार केल्यानंतर आता त्यांनी अहमदाबादमध्येच लग्न करण्याचे ठरवले आहे. अहमदाबादमध्ये लग्न करण्यामागे एक खास कारण आहे. आक्षका ही गेल्या अनेक वर्षांपासून कामासाठी मुंबईत राहात असली तरी ती मुळची अहमदाबादची आहे. त्यामुळे त्या शहरासोबत तिचे एक विशेष नाते आहे. याविषयी आक्षका सांगते, ब्रेंटला नेहमीच भारतीय रितीरिवाजानुसारच लग्न करायचे होते. त्यामुळे आम्ही माझे आई-वडील जिथे राहातात, तिथेच लग्न करण्याचे ठरवले. अहमदाबाद या शहरासोबत माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. मी माझ्या आयुष्याची १६ वर्षं इथे राहिली आहे. त्यामुळे येथील प्रत्येक ठिकाण मला माझ्या जवळचे वाटते. गुजरातमधील जेवण, गरबा तर खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे माझ्या सासू-सासऱ्यांना देखील गुजरातमधील संस्कृती खूप आवडेल याची मला खात्री आहे. ब्रेंटच्या एका चुलत भावाचे लग्न देखील गुजरातमध्येच झाले आहे. त्यामुळे त्याची देखील गुजरातमध्येच लग्न करण्याची इच्छा होती आणि त्यात त्याला गुजराती जेवण खूप आवडते. आक्षका आणि ब्रेंटची भेट गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती. ते दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. ब्रेंट हा एक व्यवसायिक आहे. तो मुळचा अमेरिकेचा असला तरी आक्षकासाठी तो गेल्या सप्टेंबरपासून भारतातच राहात आहे.Also Read : आक्षका गोराडिया प्रियकर ब्रेंट गोबलसोबत करणार अहमदाबादमध्ये लग्न