Join us  

​डान्सिंग अंकल आणि गोविंदा थिरकणार डान्स दिवाने या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 6:57 AM

उत्कृष्ट डान्सर त्यांच्या कौशल्याने उत्कृष्ट बनत नाहीत तर ते त्यांच्या पॅशनमुळे प्रसिद्ध होतात. संपूर्ण देशात एकमेव डान्स दिवानेच्या शोधासाठी ...

उत्कृष्ट डान्सर त्यांच्या कौशल्याने उत्कृष्ट बनत नाहीत तर ते त्यांच्या पॅशनमुळे प्रसिद्ध होतात. संपूर्ण देशात एकमेव डान्स दिवानेच्या शोधासाठी कलर्स भारतातील तीन पिढ्यांना मोठ्या मंचावर त्यांची कला सादर करण्याची संधी दिली आहे आणि याचे परीक्षक माधुरी दीक्षित, शशांक खेतान आणि तुषार कालिया आहेत. डान्ससाठी असणाऱ्या पॅशनवर भर देणाऱ्या या मंचावर सर्व प्रकारच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे आणि त्यांचे लहान मुले, तरूण आणि प्रौढ असे तीन गट पाडण्यात आले आहेत. प्रत्येक श्रेणीतील एक असे तीन फायनलिस्ट डान्स दिवाना बनण्यासाठी स्पर्धा करणार आहेत. हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असला तरी प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला खूपच चांगला पाठिंबा मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक खूप चांगले डान्सर असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.डान्स करायला वयाचे बंधन नसते हे डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांनी सिद्ध केले आहे. आप के आ जाने से या गाण्यावरील त्यांचे नृत्य नुकतेच व्हायरल झाले आणि लाखो लोक त्यांचे फॅन झाले. संजीव यांनी अनेक मुलाखतीमध्ये सांगितले होते की, गोविंदाचे ते खूप मोठे फॅन असून गोविंदासोबत नृत्य करणे हे त्यांचे स्वप्न आहे. कलर्सने हे त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी भारताच्या डान्सिंग सुपरस्टारला गोविंदाला डान्स दिवाने या कार्यक्रमात आमंत्रित केले आणि शोच्या आगामी एपिसोड मध्ये संजीव आणि गोविंदा एकत्र येणार आहेत. याविषयी डान्सिग अंकल सांगतात, “मी गोविंदाचा अतिशय मोठा चाहता आहे आणि गोविंदा सोबत एका मंचावर डान्स करणे हे माझे स्वप्न आहे. मी व्हिडिओ मध्ये माझी डान्स विषयी आवड दाखविल्यापासून डान्स दिवानेची टीम माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. मला इतका पाठिंबा दिल्यासाठी मी कलर्सचा अत्यंत आभारी आहे.”प्रेक्षकांना हा आगामी भाग लवकरच पाहायला मिळणार आहे. डान्सिंग अंकल आणि गोविंदाला एकत्र थिरकताना पाहाणे हा प्रेक्षकांसाठी खूपच चांगला अनुभव असणार आहे. Also Read : ​...जेव्हा डान्सिंग अंकलने सुपरस्टार सलमान खानसमोर धरला ठेका