Join us  

अन् प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह सोनू सूदसमोर ढसाढसा रडली, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 10:55 AM

Bharti Singh get emotional in front of Sonu Sood  : मी इतकीही स्टॉन्ग नाही की... म्हणत, भारतीला अश्रू अनावर

ठळक मुद्देशनिवारी सोनू सूद स्पेशल गेस्ट म्हणून ‘डान्स दीवाने’मध्ये सहभागी झाला होता. 

आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन भारती सिंह  (Bharti Singh)एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये ढसाढसा रडली. होय, कलर्स वाहिनीवरील ‘डान्स दीवाने’ (Dance Deewane) या शोच्या सेटवर असे काही घडले की, भारती तिचे अश्रू रोखू शकली नाही. इतकेच नाही आता मी आई बनू इच्छित नाही, असे रडता रडता तिने सांगितले. भारतीचे हे अश्रू बघून जजच्या खुर्चीवर बसलेले सोनू सूद (Sonu Sood)आणि नोरा फतेही दोघांचेही डोळे डबडबले़ त्यांनाही अश्रू रोखता आले नाहीत. (Dance Deewane Bharti Singh get emotional in front of Sonu Sood )

शनिवारी सोनू सूद स्पेशल गेस्ट म्हणून ‘डान्स दीवाने’मध्ये सहभागी झाला होता. कोरोना काळात सोनूने हजारो लोकांना मदत केली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्याने हजारो स्थलांतरित मजुरांना मदतीचा हात दिला. कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले असताना आताही सोनू लोकांची मदत करतोय. शनिवारच्या एपिसोडमध्ये सोनूने कोरोना व त्याच्याशी संबंधित अनेक दु:खद कहाण्या ऐकवल्या. एक डान्स परफॉर्मन्समध्ये कोरोनामुळे सर्वात कमी वयाच्या 14 दिवसांच्या बाळाच्या वेदनादायी मृत्यूची कथा सादर केली गेली. हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर भारती प्रचंड भावुक झाली.

 आईला कोरोना झाल्यानंतर तिची स्थिती कशी होती, हे सांगताना भारतीला भरून आले. माझ्या आईला कोरोना झाला होता. ती फोन करायची आणि रडायची़ समोरचे अंकल कोरोनामुळे गेलेत, असे ती मला सांगायची. ते ऐकल्यावर मला तर असाच फोन येणार नाही ना, या विचाराने मी घाबरून जायचे. इतक्या छोट्या छोट्या जीवांनाही कोरोना होतो, हे मला माहित नव्हते, असे म्हणत तिचा बांध फुटला.ती म्हणाली, सोनू भाई मी व हर्ष मुलाबद्दल प्लान करत होतो. पण या भीषण स्थितीबद्दल आणि अशा अनेक गोष्टी ऐकल्यानंतर आता बाळ जन्माला घालण्याचा धीरच होत नाही. मला असे रडायचे नाही़ मी खूप स्ट्रॉन्ग आहे. पण मी इतकीही स्ट्रॉन्ग नाही की, इतक्या छोट्या जीवाला गमावल्याचे असे दु:ख सहन करू शकेल. बाळाच्या प्लानिंगबद्दल हर्षबद्दल बोलण्याची माझी हिंमतच होत नाही, असे भारती म्हणाली. तिची ती अवस्था बघून सेटवरचे वातावरण काही क्षण गंभीर झाले होते.

टॅग्स :भारती सिंगसोनू सूद