Join us  

मेहंदी है रचने वाली! दलजीत कौरच्या हातावर लागली मेहंदी, दुसऱ्या लग्नाची रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:59 AM

दलजीत कौर तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूप उत्साहित आहे.

अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) लवकर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. युकेमधील बिझनेसमन निखिल पटेलला डेट करते आहे. दोघांचे रोमाँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या दोघांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन सुरु झालेत. दोघांच्या मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ सोशल व्हायरल झालेत. दलजीत कौरचं पहिलं लग्न अभिनेता शालीन भनोटसोबत झाले होते. त्यांचं नातं फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे, दलजीत कौरसोबत लग्नगाठ बांधणार  निखिल पटेल आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन मुली आहेत.

दलजीतच्या मेहंदीचा व्हिडीओ व्हायरल दलजीत कौरच्या मेहंदी फंक्शनचा व्हिडीओमध्ये तिच्या हातावर मेहंदी लागलेली दिसते आहे. दलजीत तिच्या हातावरची मेहंदी दाखवताना दिसत आहे. दलजीत कौर तिच्या लग्नाबद्दल खूप उत्साहित आहे. दलजीत कौर आणि आणि निखिल पटेलची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. 

 

गेल्या वर्षी दुबईत मित्राच्या पार्टीत दलजीत पहिल्यांदा निकला भेटली होती. त्या काळात दोघेही फक्त मुलांबद्दल बोलायचे आणि कुणाच्याही मनात प्रेमाची भावना नव्हती. दोघेही काळाच्या ओघात प्रेमात पडले. जवळपास एक वर्ष निखिलसोबत रिलेशनशिपमध्ये दिलजीतने लग्नाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीचे यापूर्वी शालीन भनोटसोबत लग्न झाले होते. 2009 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, मात्र त्यानंतर लगेचच दलजीत आणि शालीन यांच्यात भांडणाच्या बातम्या येऊ लागल्या. हे भांडण इतके वाढले की अखेर 2013 मध्ये दोघांनी आपले मार्ग वेगळे केले. 
टॅग्स :दलजीत कौरटिव्ही कलाकार