Join us  

चक्क कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर आली छोले कुल्चे विकायची वेळ, व्हिडीओच आहे पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 5:14 PM

छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही त्याने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत.

चर्चेत राहण्यासाठी सेलिब्रेटी मडळी ना-ना त-हा करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.आपल्या टॅलेन्टच्या जोरावर आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सुनीलने इंडस्ट्रीत आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही त्याने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध चित्रपटातील त्याच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी सुनिल आपल्या हटके मेजशीर अंदाजाने लक्ष वेधून घेत असतो.

सुनिल ग्रोवर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे कॉमेडी व्हिडीओ फोटो चाहत्यांसह तो शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचा विनोदी अंदाज पाहून अंदाज येईलच. ऑनस्क्रीन असो या ऑफस्क्रीन सुनिल ग्रोव्हर नेहमीच मेजशीर अंदाजात राहणे पसंत करतो. रसिकांना खळखळून हसवत असतो. त्यामुळे आज लाखोंच्या संख्येत सुनिल ग्रोव्हरचे चाहते जगभरात पसरले आहेत.

पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. चर्चेला कारणीभूत ठरला आहे त्याचा हा खास व्हिडीओ. व्हिडीओमध्ये तो छोले कुल्चे विकत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओ मजेशीर असून चाहतेही त्याला कमेंटच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारत मजा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुनिल ग्रोवरही व्हिडीओसाठी करत असलेले कामाचाही आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्याचा हा  व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Lockdown : घराबाहेर पडला सुनील ग्रोव्हर, असे पडले पोलिसांचे दंडुके!! पाहताच आवरणार नाही हसू

लॉकडाऊनदरम्यान सरकार वारंवार लोकांना घरात राहण्याचे, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत होते. पण काही लोक विनाकारण घराबाहेर पडत होते. अशा लोकांना दंडुके लावण्याचे, प्रसंगी उठाबशा काढण्याचे काम पोलिसांनी सुरु केले होते. या मीमवरून याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.खुद्द सुनील ग्रोव्हरने हे मीम त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते. ‘हाहाहा...देवा शप्पथ घरी राहा..., ’ असे हे मीम शेअर करताना त्याने लिहिले होते.

टॅग्स :सुनील ग्रोव्हर