Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ससुराल सिमर का' मालिकेच दुसरे पर्व रसिकांच्या भेटीला, दिपिका कक्करचा नवीन लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 20:34 IST

Sasural Simar Ka Season 2: 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिचा पहिला लूक समोर आला आहे. मालिकेत नवीन कलाकारांना संधी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा सिमर आणि  तिचे कुटुंब यांच्या जीवना भोवती कथा गुंफली जाणार आहे. 

 'ससुराल सिमर का' मालिकेने 7 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.  सिमर आणि रोलीच्या जीवनावर आधारित मालिकेला रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. तिची लोकप्रियता पुन्हा एकदा इनकॅश करण्याचा मालिकेच्या निर्मात्यांचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा नव्या ढंगात 'ससुराल सिमर का 2'  रसिकांच्या भेटीला येत आहे. टेलिव्हिजनची लाडकी बहू असलेली सिमरने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांची पसंती मिळवली होती. सिमर भूमिकेच्या माध्यमातून दीपिका कक्कर पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.मालिकेतील तिचा पहिला लूक समोर आला आहे. मालिकेत नवीन कलाकारांना संधी देण्यात आली आहे. पुन्हा एकदा सिमर आणि  तिचे कुटुंब यांच्या जीवना भोवती कथा गुंफली जाणार आहे. 

दिपिका कक्कर म्हणाली, “मी नेहमीच म्हणते की सिमर हा माझाच भाग आहे व ती नेहमी माझ्या सोबतच असते आणि आज मी जी काही आहे ती या शो मुळेच आहे, माझ्या अभिनय प्रवासाचे हे मूळ आहे तसेच या शो मधूनच मला माझे जीवनातील प्रेम माझा पती शोएब भेटला आहे. शोसोबतची 6 वर्षे खूप सुंदर प्रवासाची होती आणि माझ्या प्रेक्षकांशी जोडले जाणे खूप सुंदर अनुभव होता.

 

जेव्हा मला दुसऱ्या सीझनसाठी विचारणा झाली तेव्हा खूप आनंद झाला. पुन्हा ते दिवस जगता येतील. शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये सिमर एका नव्या अवतारात, सध्याच्या काळात जगताना आणि तिच्या मार्गातील आव्हानांना सामोरे जाताना  दिसणार आहे. या शोमध्ये रसिकांना खूप काही नवीन रंजक घडामोडी पाहायला मिळतील. त्यामुळे पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास मी सज्ज आहे. 

 

टीव्ही इंडस्ट्रीतील दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. त्यामुळे दिपिकासह पुन्हा एकदा शोएबही झळकणार आहे का याबाबत माहिती समोर आली नाही. शोएबने 'ससुराल सिमर का' ही मालिका सोडल्यानंतर दीपिका शोएबची कमतरता जाणवू लागली होती. या काळात दिपिका फार खचून गेली होती. त्यानंतर  दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तीन-साडे तीन वर्ष त्यांनी एकमेंकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकल्याचा निर्णय घेतला होता. 'कोई लौट के आया है' या मालिकेत देखील दिपिका आणि शोएबने एकत्र काम केले होते. या मालिकेतील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूपच आवडली होती. दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने 'नच बलिये' या कार्यक्रमात देखील एकत्र भाग घेतला होता. त्यामुळे रसिकांची आवडती ऑनस्क्रीन जोडी ख-या आयुष्यात तर एकत्र आली ऑनस्क्रीन एकत्र येणार का ? याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.