Join us  

लोककलेवर आधारित "एकदम कडक" कार्यक्रम लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 8:00 AM

"एकदम कडक" या कार्यक्रमातून समाजाच्या भावभावना, आशा आकांक्षा, विविध वृत्ती- प्रवृत्ती, रूढी परंपरा यांचा मागोवा घेतला जाणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अस्सल कलावंतांना इथे व्यासपीठ मिळणार आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलाकार आपली कला सादर करतील.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक आदर्श शिंदे करणार आहे

विविध कला आणि संस्कृतींनी नटलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे मानाचे पान म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला. मनोरंजनाच्या भाऊगर्दीत महाराष्ट्राच्या या लोककला आज लोप पावताना दिसत आहेत आणि पिढ्यान् पिढ्या या कला जोपासणारे लोककलावंतही आज हरवत चालले आहेत.  "एकदम कडक " हा नवा कोरा शो घेऊन कलर्स मराठी अवतरत आहे. कलेला किंमत आणि कलावंताला हिम्मत देणारा हक्काचा मंच असेल, “एकदम कडक”! या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक आदर्श शिंदे करणार आहे. हा कार्यक्रम २८ जानेवारीपासून सोमवार ते बुधवारी रात्री साडे नऊ वाजता कलर्स मराठीवर सुरु होणार आहे.

"एकदम कडक" या कार्यक्रमातून समाजाच्या भावभावना, आशा आकांक्षा, विविध वृत्ती- प्रवृत्ती, रूढी परंपरा यांचा मागोवा घेतला जाणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अस्सल कलावंतांना इथे व्यासपीठ मिळणार आहे. यात सामूहिक जीवनातले बारकावे, गावगाड्यातील वहिवाटी, आणि अनेक परंपरांमागची कथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या नि अशा कित्येक कलापरंपरांचा मेळा "एकदम कडक" कार्यक्रमामध्ये लवकरच भरणार आहे.

 या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलाकार आपली कला सादर करतील. तर त्यांच्या जोडीला असतील, प्रसिद्ध विनोदवीर नंदकिशोर चौघुले, , दिगंबर नाईक, भूषण कडू आणि  तृप्ती खामकर ... ज्यांची खुशखुशीत विनोदशैली, अतरंगी पात्रं, खुमासदार विनोदांची मेजवानी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणार आहे. ओंकार भाजने या कार्यक्रमाची क्रिएटीव्ही लेखनाची कामगिरी सांभळतोय. 

बी लाइव्ह प्रस्तूत, लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. अभय महाजन-दिप्ती सती ह्या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव ह्यावेळी उपस्थित होते. पूण्यात झालेल्या ह्या सोहळ्याला पूणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ह्या गाण्याच्या लाँचला खूप भारी प्रतिसाद मिळाला. टाळ्या,शिट्या आणि जल्लोषाने खच्चून भरलेल्या मॉलमध्ये गाण्याचे लाँच करण्याचा अनुभव अद्भूत होता. प्रेक्षकांनी माझ्यावर आत्तापर्यंत जे प्रेम केले आहे, त्याचा मी ऋणी आहे. आणि मला विश्वास आहे, लकी सिनेमाला ते असाच भरभरून प्रतिसाद देतील.

निर्माते सुरज सिंग म्हणाले, आम्ही खूप लकी आहोत की, आमच्या सिनेमाला रिलीज होण्याअगोदर रसिकांचे एवढे प्रेम मिळते आहे. ह्या प्रेमाने आता हुरूप आला आहे. लकी सिनेमाचे हे टायट्रल ट्रक रसिकांसाठी एक व्हिज्युअल ट्रिट आहे.

यो(सचिन पाठक) ने लिहीलेल्या ह्या गाण्याला अमितराज ह्यांनी संगीतबध्द केलंय आणि गायलंय. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत ह्यांच्यावर गाणे चित्रीत झाले आहे. मराठी सिनेसृष्टीतले हे चार सुपरस्टार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सई ताम्हणकर ह्याविषयी म्हणते, मी खूप लकी आहे, की संजयदादाच्या ब-याच सिनेमांचा मी हिस्सा होऊ शकले. लकी सिनेमाचा मी हिस्सा आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

सिध्दार्थ जाधव म्हणतो, दादांच्या सिनेमाचा हिस्सा होणे, मला नेहमीच आवडते. येरे येरे पैसा नंतर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत ह्यांच्यासोबत पून्हा एकदा ह्या गाण्यानिमीत्ताने काम करता आलंय. आमच्यासाठी हे जणू एक वर्षानंतरचे रियुनीयन’ असल्यासारखे आहे.

तेजस्विनी पंडित म्हणते, “फक्त 'येरेयेरे पैसा'च नाही तर सई आणि माझ्यासाठीही तूहिरेनंतरचेही हे रियुनियन आहे. तोळा तोळानंतर चार वर्षानी मी आणि सई एका गाण्यातून पून्हा एकदा एकत्र दिसणार आहोत. आम्ही लकी आहोत, की आम्ही सगळेच संजयदादाच्या कुटूंबाचा हिस्सा आहोत.  

उमेश कामत म्हणतो, लकी सिनेमा सुरू होण्याच्याअगोदरच मी एका व्हिडीयोतून म्हणालो होतो, की मी लकी’ असणार आहे. मी खरंच स्वत:ला लकी समजतो की, संजयदादासोबत मला पून्हा पून्हा काम करता येतं. सई, सिध्दू, तेजस्विनी आणि माझ्यावर चित्रीत झालेलं हे गाणे नक्कीच तुम्हांला आवडेल.

'बी लाइव्ह प्रॉडक्शन्सआणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हननिर्मितसंजय कुकरेजासुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेल्यासंजय जाधव दिग्दर्शित 'लकीचित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.  

 विविध शैलीतील गाणी गाऊन प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान मिळवलेला महाराष्ट्राचा लाडका गायक आणि या कार्यक्रमाचा सूत्रधार आदर्श शिंदे या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाला की , “मी महाराष्ट्राच्या मातीतला गायक आहे... लोकसंगीत, लोककला यांचा वारसा मला घरातूनच मिळाला. पण आमच्या घराचा अपवाद सोडला तर अनेक लोक कलावंतांना कधी पुढे येण्याची संधी देखील मिळालेली नाही. अशा दुर्लक्षित कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची एक सुवर्णसंधी कलर्स मराठीवरील “एकदम कडक” या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे, ही गोष्ट माझ्या मनाला खूप भावली. आणि अशा कार्यक्रमाचा भाग होण्याची, त्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच आहे. मी पहिल्यांदाच सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडणार आहे... खूप मोठी जबाबदारी आहे. हा संपूर्ण प्रवास मला एक वेगळा अनुभव देणारा असेल, हे नक्की!”. 

टॅग्स :कलर्स मराठीभूषण कडुहेमांगी कवी