Join us  

CID फेम फ्रेडरिक्स देतोय मृत्युशी लढा; हार्टॲटॅक आल्यामुळे दिनेश फडणीस रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 8:38 AM

Dinesh phadnis: मुंबईतील तुंगा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

90च्या दशकात तुफान गाजलेली मालिका म्हणजे सीआयडी (CID). ही मालिका त्याकाळी तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत येत असतो. सध्या या मालिकेतील फ्रेडरिक्स याच्याविषयी गंभीर माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे फ्रेडरिक्सला म्हणजेच अभिनेता दिनेश फडणीस ( Dinesh phadnis) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईतील तुंगा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. इतकंच नाही तर सध्या ते मृत्युशी लढा देत आहेत. रिपोर्ट नुसार, दिनेश यांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे काल (२ डिसेंबर) रात्रीच्या तुलनेत आज पहाटेपासून त्यांच्या प्रकृतीत किंचितशी सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे.

एसीपी प्रद्युमन ते दया! CID च्या कलाकारांचं एका दिवसाचं मानधन किती होतं माहितीये का?

57 वर्षीय दिनेश यांनी CID मध्ये फ्रेडिरिक्स ही भूमिका साकारली आहे. थोडीशी विनोदी झटा असलेली ही भूमिका त्यांनी अत्यंत सुंदररित्या साकारली होती.१९९८ ते २०१८ पर्यंत त्यांनी ही भूमिका केली. त्यानंतर ते तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत कॅमियो रोलमध्येही झळकले होते.

टॅग्स :टेलिव्हिजनसीआयडीसेलिब्रिटी