Join us

आपले टीव्ही स्टार्स असा साजरा करणार ख्रिसमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST

ख्रिसमसची धामधूम सुरु झाली आहे. खरे तर आठवडाभरापासूनच ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. पण आज रात्री बाराच्या ठोक्यापासून सुरु होणाºया सेलिब्रेशनची गोष्टच न्यारी. आपले टीव्ही स्टार्स या सेलिब्रेशनसाठी सज्ज आहे. जाणून घेऊ यात, हे सेलिब्रेशन कोण कसे करणार ते... टीव्ही स्टार स्रेहा वाघ यंदा ख्रिसमस ट्री व सांता क्लॉस असे दोन्हीही असणा-या मॉलमध्ये जावून ख्रिसमस साजरा करू इच्छिते.

ख्रिसमसची धामधूम सुरु झाली आहे. खरे तर आठवडाभरापासूनच ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. पण आज रात्री बाराच्या ठोक्यापासून सुरु होणाºया सेलिब्रेशनची गोष्टच न्यारी. आपले टीव्ही स्टार्स या सेलिब्रेशनसाठी सज्ज आहे. जाणून घेऊ यात, हे सेलिब्रेशन कोण कसे करणार ते... टीव्ही स्टार स्रेहा वाघ यंदा ख्रिसमस ट्री व सांता क्लॉस असे दोन्हीही असणा-या मॉलमध्ये जावून ख्रिसमस साजरा करू इच्छिते.टीव्ही स्टार रजनीश दुग्गलने गतवर्षी ख्रिसमसला मुलीसोबत जाम मस्ती केली होती. यंदा तो दिवसा शूटींगमध्ये बिझी असेल पण रात्री फॅमिली आणि मित्रांसोबत ख्रिसमस डिनरवर जाणार आहे.दिल से दिल तक या टीव्ही शोचा अभिनेता रोहन गंडोत्रा याने मित्रांसाठी पार्टी ठेवली आहे. आपल्या घरी त्याने ख्रिसमस ट्रीही सजवला आहे.टीव्ही स्टार वाहबीज दोराबजी गतवर्षीप्रमाणे यंदाही माऊंट मॅरी चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणार आहे.टीव्ही स्टार शीबा आणि भाग्यश्री दोघीही मैत्रिणी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दोघी मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करणार आहेत.गेली चहल याच्यासाठी यंदाचा ख्रिसमस आहे. कारण त्याचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. यंदा तो खास सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे.