Join us

'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर थिरकले 'मुरांबा'तील बालकलाकार, व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:23 IST

Ek Number, Tuji Kambar Song : संजू राठोडच्या 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्याची क्रेझ अजून काही संपलेली नाही. या गाण्याने सामान्यांसह अनेक सेलिब्रेटींना भुरळ घातली आहे. दरम्यान आता स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मुरांबामधील बालकलाकार आर्था म्हणजेच विश्वश्री आणि आरोही म्हणजेच आरंभी उबळे या दोघी 'एक नंबर, तुझी कंबर' या गाण्यावर थिरकल्या आहेत.

संजू राठोडच्या 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्याची क्रेझ अजून काही संपलेली नाही. या गाण्याने सामान्यांसह अनेक सेलिब्रेटींना भुरळ घातली आहे. अनेक कलाकारांनी या गाण्यावर रिल बनवले आहेत आणि त्यांचे हे रिल चांगलेच चर्चेत देखील आलेत. दरम्यान आता स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मुरांबामधील बालकलाकार आर्था म्हणजेच विश्वश्री आणि आरोही म्हणजेच आरंभी उबळे या दोघी 'एक नंबर, तुझी कंबर' या गाण्यावर थिरकल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

विश्वश्री आणि आरंभी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रिल शेअर केला आहे. ज्यात त्या दोघी संजू राठोडच्या 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्या दोघींनी हा व्हिडीओ मालिकेच्या सेटवर शूट केला आहे. या दोघींनी या गाण्यावर खूप छान डान्स केला आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

'मुरांबा' मालिकेबद्दल'मुरांबा' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. गणेशोत्सवानिमित्ताने रमा पुन्हा एकदा मुकादमांच्या घरात राहायला आली आहे. इरावतीचे आताही कटकारस्थानं सुरुच आहेत. एकीकडे आरोहीला आईचं प्रेम मिळावं आणि तिच्यासोबत वेळ व्यतित करता यावा म्हणून रमा तिथे राहायला गेली आहे. मात्र इरावती आरोही आणि अक्षयच्या मनात रमाबद्दल द्वेष निर्माण करत आहे. त्यामुळे रमा इरावतीचा खरा चेहरा अक्षयसमोर उघडकीस आणेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.