Join us

​चेतन या मालिकेसाठी घेतोय मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 17:51 IST

क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता चेतन हंसराज सध्या चंद्र-नंदिनी या ...

क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता चेतन हंसराज सध्या चंद्र-नंदिनी या मालिकेत चाणक्याचा शिष्य पर्वतक मलयकेतूची भूमिका साकारत आहे. तो चंद्रगुप्तचा कट्टर विरोधक असल्याचे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. चेतनसाठी पौराणिक मालिकांमध्ये काम करणे काही नवीन नाही. त्याने महाभारत या मालिकेपासूनच त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेत त्याने छोट्या बलरामाची भूमिका साकारली होती. तसेच त्याने वीर शिवाजी या मालिकेतही काम केले होते. त्यामुळे कोणतीही पौराणिक भूमिका तो सहजतेने साकारू शकतो. पण चंद्र-नंदिनी या मालिकेत त्याला अॅक्शन दृश्य चित्रीत करायचे असल्याने त्याने यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. तो सध्या या मालिकेसाठी खास मार्शल आर्टस शिकत आहे. मार्शल आर्टमुळे त्याची एनर्जी वाढली असल्याचे त्याला वाटते. चेतन सांगतो, "मला स्वतःला फिट राहायला आवडते. त्यासाठी कितीही तास जिममध्ये घाम गाळण्याची माझी तयारी असते. व्यायाम हा माझ्या रोजच्या आयुष्याचा एक भागच बनला आहे. त्यामुळे कोणत्याही भूमिकेसाठी शरीर तंदुरुस्त बनवणे माझ्यासाठी नवीन नाही. पण या मालिकेत काही अॅक्शन दृश्य चित्रीत करायचे असल्याने मी या भूमिकेसाठी मार्शल आर्ट शिकलो. तीन महिने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. यामुळे माझे शरीर आणि स्नायू यांच्यामध्ये चांगलाच फरक मला आता जाणवायला लागला आहे. या कार्यक्रमामुळे मी एक नवीन गोष्ट शिकलो याचे मला समाधान वाटत आहे."