Join us

नववधू अंदाजातील सुमोना चक्रवर्तीचा फोटो आला समोर, चाहतेही संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 16:57 IST

नुकताच सुमोनाचा नववधू अंदाजातील फोटो समोर आला आहे. फोटोत सुमोनाच्या अदा कुणालाही घायाळ करणार अशाच आहेत.

कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्तीने  आपल्या कॉमेडीने रसिकांची मनं तर जिंकली आहेतच मात्र  सोशल मीडियावरही ती नेटीझन्सचे आपल्या वेगवेगळ्या फोटोंमुळे लक्ष वेधून घेत असते. विविध स्टाईलमधील सुमोनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.  मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळते. काही फोटोंमध्ये सुमोनाचा निरागसपणा दिसून येतो तर काही फोटोंमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात.

नुकताच सुमोनाचा नववधू अंदाजातील फोटो समोर आला आहे. फोटोत सुमोनाच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. मात्र हा नववधू रुपातील अंदाज पाहून सुमोना लग्न करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. खुद्द सुमोनानेच इन्स्टाग्रामवर तिचा हा फोटो शेअर करत 'दुल्हन तैयार है' अशी कॅप्शनही दिली आहे. मात्र सुमोनाने नववधूचा केलेला पेहराव तिच्या फोटोशूटसाठी असावा किंवा मग कपिलच्या शोमध्ये लग्नाच्या सिक्वेन्ससाठी सुमोना तैयार झाली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे.  सुमोनाने कोणत्या प्रोजेक्टसाठी हा मेकअप केला आहे याविषयी कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाहीय.

गेल्या काही दिवसांपासून सुमोनाच्या लग्नाच्या चर्चा आहेत. भविष्यात सुमोना बॉयफ्रेंड सम्राट मुखर्जीसह लग्नाच्या बेडीत अडकू शकते. मात्र सुमोनाने तिच्या अफेअरच्या चर्चांवर मौनच बाळगले आहे.  सम्राट हा अभिनेत्री काजोलचा चुलत भाऊ आहे. तसेच योग्य वेळ येईल आणि पुढचं पाऊल टाकण्याची वेळ येईल त्यावेळी माझ्या जीवनातील त्या व्यक्तीबाबत खुलासा करेन असं सुमोनाने दिलेल्या एका मुलाखती म्हटले आहे. 

टॅग्स :सुमोना चक्रवर्ती