Join us

अक्षर कोठारी रंगभूमीवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 13:10 IST

सध्या मराठी कलाकार हे रंगभूमीच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. कारण एकापाठोपाठ एक मराठी कलाकार रंगभूमीकडे वळताना पाहायला मिळत आहेत. ...

सध्या मराठी कलाकार हे रंगभूमीच्या प्रेमात पडलेले दिसत आहे. कारण एकापाठोपाठ एक मराठी कलाकार रंगभूमीकडे वळताना पाहायला मिळत आहेत. सुयश टिळक, सौरभ गोखले, सुरूची आडारकर, निखिल राऊत यांच्यापाठोपाठ आता अभिनेता अक्षर कोठारी हादेखील रंगभूमीकडे वळणार असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षर कोठारीची कमला ही मालिका संपली आहे. या मालिकेच्या माध्यमातून अक्षर याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजिवले आहे. या मालिकेत त्याच्यासोबत समीधा गुरू, दिप्ती केतकर सामेल, आश्विनी कासार, प्रमोद पवार, संध्या म्हात्रे अशा अनेक कलाकारांचा या मालिकेत समावेश होता. या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली होती. आता, अक्षरची आगामी मालिका चाहूल हीदेखील प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेच्या माध्यमातून  गूढ रहस्य असणारी मालिका पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला जाणीवे पलीकडच्या गूढरम्यतेचं आकर्षण असतं आणि त्याविषयी भीतीही असते. याच भयाच्या भावनेला चाहूल या मालिकेतून साद घालण्यात येणार आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम केल्यानंतर त्याला विसरणं अशक्य असतं आणि ती व्यक्ती आपली न होता कोणा दुसºयाची होणार आहे, ही भावना तर असह्य असते. मग सुरू होतो खेळ, एक अधुरी प्रेमकहाणी जन्मजन्मान्तरी पूर्ण करण्याचा... आयुष्यसंपलं तरी प्रेम संपत नाही, या न्यायाने रहस्याच्या आधारे भीती आणि प्रीतीच्या प्रवासाचा... हीच चित्तथरारक प्रेमकहाणी चाहूल मालिकेत साकार होणार आहे. अशा या रहस्यमय मालिकेत अक्षर हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो आता रंगभूमीवर ही येणार असल्याने त्याच्या चाहत्यांना आनंददेखील नक्कीच झाला असणार.