Join us
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती लहान पण किर्ती महान, 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर होतोय शुभेच्छाचा वर्षाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 11:45 IST

करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स व कन्हैया या नाटकात काम केले आहे.

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता अंकुर गाढवेचाही यात समावेश आहे.

चला हवा येऊ द्या’ या शोमधील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. अगदी त्याच प्रमाणे अंकुर वाढवे या कलाकारावरही रसिक भरभरून प्रेम करतात. याच शोने अंकुरला ओळख मिळवून दिली. आता अंकुर पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. त्याने त्याच्या मेहनतीने गाडी खरेदी केली आहे. खुद्द अंकुरनेच त्याचा हा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. त्याच्या आयुष्यातील त्याच्या कमाईने खरेदी केलेही ही पहिलीच गाडी असल्यामुळे तो खूप खुश आहे. आणि म्हणून ही गाडी त्याच्यासाठी खूप खासही आहे.

गेल्याचवर्षी २८ जूनला अंकुरचा विवाह पार पडला. कोर्ट मॅरेज करत त्याने त्याच्या आयुष्याला नवीन सुरूवात केली होती.अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स व कन्हैया या नाटकात काम केले आहे.

तसेच  रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. अगदी त्याचप्रमाणे अंकुर हा कमाईच्या बाबतीत मराठीतील बड्या बड्या कलाकारांनाही टककर देतो. महिन्याला अंकुरहा चार लाख रू. इतके कमावत असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या