कोजागिरीचे दणक्यात सेलिब्रेशन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 13:29 IST
नुकतीच सगळीकडे कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली.पौर्णिमेचा चंद्र पाहून कोजागिरी साजरी केली जाते. मात्र छोट्या पडद्यावरील गणपती बाप्पा मोरया या ...
कोजागिरीचे दणक्यात सेलिब्रेशन !
नुकतीच सगळीकडे कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली.पौर्णिमेचा चंद्र पाहून कोजागिरी साजरी केली जाते. मात्र छोट्या पडद्यावरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेत श्रीगणेशाचा चेहरा चंद्ररुपात आकाशात दाखवण्यात आला. या मालिकेत पार्वतीने कोजागिरी साजरी केली.ऑनस्क्रीन तर कोजागिरीचं दणक्यात सेलिब्रेशन झालेच तसेच ऑफस्क्रीनसुद्धा या मालिकेच्या कलाकारांनी विशेष अंदाजात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. मालिकेतील कलाकारांनी कोजागिरीसाठी खास तयारी केली होती. प्रत्येकाने काहीना काही वेगळे पदार्थ बनवून आणले होते.शूटिंग संपल्यानंतर या कलाकारांनी मग दणक्यात कोजागिरीचे सेलिब्रेशन केले.