ऋता दुर्गुळेने सोशल मीडियावर सुरू केले हे कॅम्पेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:59 IST
नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात. कलाकारांच्या ...
ऋता दुर्गुळेने सोशल मीडियावर सुरू केले हे कॅम्पेन
नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील गोंडस आणि सुंदर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक उपक्रम राबवला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाले.आपल्या आवडत्या कलाकाराविषयी अधिकची माहिती अथवा आपल्या कलाकाराची आवड-निवड जाणून घ्यायला मिळाली की चाहत्यांना आनंद वाटतो आणि जर ही माहिती स्वत: कलाकार देत असेल तर त्यांच्यासाठी ही खरोखरच आनंदाची गोष्ट असते. अभिनय क्षेत्रात व्यग्र असूनही ऋताने वेळात वेळ काढून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर #GetToKnowHruta ही कॅम्पेन सुरू केले होते. ज्यामध्ये तिने चाहत्यांना तिचे आवडते कलाकार, पदार्थ, चित्रपट, गाणी, छंद ओळखायला सांगितले होते. फॅन्सनी योग्य अंदाज बांधल्यावर ऋताने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. अशाप्रकारे #GetToKnowHruta कॅम्पेनमुळे फॅन्सना त्यांची लाडकी अभिनेत्री ऋताविषयी नवीन जाणून घ्यायला मिळाले.ऋता दुर्गुळे ही मुळची मुंबईची असून तिचे शिक्षण रुईया कॉलेजमधून झाले आहे. तिच्या घरातील कोणीच अभिनयक्षेत्रात नसल्यामुळे या क्षेत्रात प्रवेश करणे तिच्यासाठी कठीण होते. पण तरीही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर एंट्री मारली. तिच्या दुर्वा या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. सध्या ती झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ही मालिका आणि ऋताची भूमिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला नेहमीच सांगत असतात. Also Read : ऋता दुर्गुळेने असा साजरा केला 'गुढीपाडवा'