Join us

बकुला का भूत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 15:15 IST

‘बकुला का भूत’ या आगामी मालिकेत एक अगदी आगळीवेगळी भूमिका साकारण्यासाठी जेडी मजेठिया यांनी एका नव्या चेहर्‍याची निवड केली ...

‘बकुला का भूत’ या आगामी मालिकेत एक अगदी आगळीवेगळी भूमिका साकारण्यासाठी जेडी मजेठिया यांनी एका नव्या चेहर्‍याची निवड केली आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकांसाठी याआधी सरिता जोशी आणि अपरा मेहता यांची निवड झाली आहे. नवोदित मुस्कान भामने हिला ढब्बूच्या भूमिकेसाठी संधी देण्यात आली आहे. ढब्बू ही तरुण पण काहीशी भित्री मुलगी देवासोबत आणि विविध वस्तूंसोबत संवाद साधू शकते.तिच्या या विचित्र स्वभावामुळे सगळ्यांच्या मते ती मुर्ख आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी मुस्काननेशब्दभ्रमाची कला शिकण्याचे ठरवले. शब्दभ्रमात विविध व्यक्तिरेखांचे आवाज काढण्यासाठी विशिष्ट तंत्र वापरले जाते. खरे तर, आता मुस्कान या कलेत अगदी निपुण झाली आहे आणि अगदी तीक्ष्ण कानांनाही ती गुंगारा देऊ शकेल.मुस्कान म्हणाली, ‘‘मला ‘बकुला बुवा का भूत’ या मालिकेत एक साधी पण काहीशी विचित्र, वस्तूंशी बोलूशकणारी मुलगी अशी व्यक्तिरेखा साकारताना फारच मस्त वाटतेय. या भूमिकेत शिरण्यासाठी मी काही खास प्रशिक्षण घेतले. त्यामुळे, मी विविध प्रकारचे आवाज काढू शकते. हा अनुभव प्रचंड मेहनतीचा आणि कठीण असला तरी फारच छान होता.’’आगळ्यावेगळ्या आणि काहीशा विचित्र व्यक्तिरेखा पडद्यावर आणण्यात हॅट्स ऑफ प्रोडक्शनचा हातखंडा आहे.आता ढब्बूसुद्धा एक औत्सुक्यपूर्ण व्यक्तिरेखा ठरेल, असे दिसतेय. जेडी मजेठिया यांच्या अनेक मालिका टीव्हीवर गाजल्या आहेत. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेची वेब सिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानंतर खिचडी ही त्यांची मालिकाही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजते आहे.