Join us  

छोट्या पडद्यावरील ‘नागिन’चं ‘ब्रेक’अप?, सोशल मीडियावरील अनिता हसनंदानीच्या ‘त्या’ फोटोची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 3:10 PM

या पोस्टमध्ये अनिताने तिचा आणि पती रोहित रेड्डीचा एकत्र असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने ब्रेक अप इमोजी शेअर केले आहे.

छोट्या पडद्यावरील नागिन फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे आम्ही म्हणत नसून खुद्द अनितानं याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर अनिताने शेअर केलेला एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमधून तिने आपल्या मनातल्या वेदना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या पोस्टमध्ये अनिताने तिचा आणि पती रोहित रेड्डीचा एकत्र असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने ब्रेक अप इमोजी शेअर केले आहे.

या फोटोत अनिता आणि तिचा पती रोहित यांचा एकत्र फोटोची फ्रेम आहे. मात्र ही फ्रेम जमिनीवर पडल्याने तुटली असल्याचे या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. फोटो फ्रेमच्या काचा अस्ताव्यस्त पसरल्याचेही दिसत आहे. हे पाहून अनिताला बहुदा प्रचंड वेदना होत आहेत. आपल्या मनातील याच वेदना आणि दुःख यांना या पोस्टच्या माध्यमातून मोकळी वाट करून दिली आहे. अनिताच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. 

अनिताच्या काही फॅन्सनी कमेंट्सच्या माध्यमातून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, “काच तुटणं चांगलं असतं. अनेकदा त्यामुळे आपल्यावरील संकटंसुद्धा दूर होतात.” दुसऱ्या एका फॅनने तिला सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. “उदास होऊ नको, सकारात्मक विचार कर” असं या फॅनने कमेंट पोस्ट केली आहे. अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी २०१३ साली रेशीमगाठीत अडकले होते. दोघांचा प्रेमविवाह होता. अनिता सध्या नागिन-३ मध्ये पाहायला मिळत आहे. यांत ती विश ही भूमिका साकारत आहे. लवकरच ही मालिका रसिकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या मालिकेच्या जागी एकता कपूरची नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

'नागिन-३' या मालिकेच्या जागी 'कवच-२' ही नवी मालिका सुरू होणार आहे. कवच मालिकेचा हा दुसरा भाग असेल. कवच मालिकेत मोना सिंग आणि विवेक दहिया प्रमुख भूमुकेत होते. कवच-२ मालिकेसाठी सध्या ऑडिशन्स सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागिन-३ मालिकेने निरोप घेणे रसिकांसाठी झटक्यापेक्षा कमी नसेल. नागिन मालिकेच्या आधीच्या दोन्ही पर्वात मौनी राय प्रमुख भूमुकेत होती. पहिल्या पर्वात मौनीसह अर्जुन बिजलानी तर दुसऱ्या पर्वात करणवीर वोरा होता. या तिसऱ्या पर्वात मौनीची जागा सुरभी ज्योती, अनिता हसनंदानी आणि पर्ल पुरी यांनी घेतली आहे. नागिन-३ मध्ये लवकरच माहिरचं तिसरं लग्न पाहायला मिळेल.  

टॅग्स :नागिन 3