ब्रम्हराक्षस नव्या रूपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 16:56 IST
ब्रम्हराक्षस-जाग उठा शैतान या मालिकेत पराग त्यागी ब्रम्हराक्षसची भूमिका साकारत होता. पण आता किश्वर मर्चंट प्रेक्षकांना ब्रम्हराक्षसच्या भूमिकेत पाहायला ...
ब्रम्हराक्षस नव्या रूपात
ब्रम्हराक्षस-जाग उठा शैतान या मालिकेत पराग त्यागी ब्रम्हराक्षसची भूमिका साकारत होता. पण आता किश्वर मर्चंट प्रेक्षकांना ब्रम्हराक्षसच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढील काही भागांमध्ये ब्रम्हराक्षसचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे आणि ब्रम्हराक्षसचा आत्मा अपराजिताच्या म्हणजेच किश्वरच्या अंगात शिरणार आहे. त्यामुळे आता किश्वर मालिकेत अपराजिता आणि ब्रम्हराक्षस अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या मालिकेतील किश्वरचा लूकही खूप वेगळा असणार आहे. तिचा हा लूक पाहून प्रेक्षक किश्वरला घाबरायला लागणार आहेत यात काही शंकाच नाही. कारण किश्वरच्या या लूकवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. किश्वरला हा मेकअप करण्यासाठी अनेक तास आरशाच्या समोर बसायला लागते. पण किश्वर तिचा हा लूक आणि या मालिकेतील तिच्या दोन्ही भूमिका खूप एन्जॉय करत आहे.