Join us  

Boldness Alert! निया शर्माचे हे बोल्ड फोटो पाहून भडकले फॅन्स; म्हणाले, विश्वास बसत नाही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 3:54 PM

निया शर्माने एक व्हाइट कलरचा स्विमसूटमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो फारच बोल्ड असून व्हायरल झालाय. तर अनेकांनी या फोटोवर टीकाही केली आहे.

टीव्हीवरील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून आता निया शर्माचं नाव घेतलं तर वावगं ठरू नये. कारण तिचे सोशल मीडियावरील फोटोंना पाहून तर हेच वाटतं की, तिने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या. ती सोशल मीडियावर एकापाठी एक इतके बोल्ड फोटो शेअर करते की, तिच्या फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढतात. पण सर्वांनाच तिचा हा बोल्ड अंदाज पसंत पडतो असे नाही तर काही यावर नाराजीही व्यक्त करतात. अशात नियाच्या एका स्विमसूटवरील फोटोशूटवर काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत.

निया शर्माने एक व्हाइट कलरचा स्विमसूटमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो फारच बोल्ड असून व्हायरल झालाय. आपल्या बॉडी आणि फॅशनबाबत नेहमीच कॉन्फिडेन्ट राहणारी निया या बोल्ड फोटोतही आपल्या अदा बिनधास्त दाखवत आहे. त्यामुळेच या फोटोत तिचे कपडे कमी असूनही ती तिच्या अदांमुळे जास्त बोल्ड दिसत आहे.

हे फोटो पाहून तिचे काही फॅन्स चांगलेच भडकले आणि तर जास्तीत जास्त फॅन्सनी तिचं कौतुकही केलंय. एकाने लिहिले की, 'मी हिला जमाई राजा मालिकेत पाहिलं होतं, विश्वास बसत नाही की ही इतकी निर्लज्ज झाली'. तर एकजण म्हणाला की, 'अशाप्रकारचे कपडे घातल्याशिवाय काम मिळत नाही का?'. अशा अनेक टीका करणाऱ्या कमेंट्स आहेत.

अभिनेत्री निया शर्मा ही आता लोकप्रिय 'नागिण' मालिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा लूक असलेला टीजरही समोर आला होता. ज्यात ती सुंदर दिसत आहे. अशात तिच्या या फोटोंची चर्चा झाली नसती तर नवल. भलेही लोकांना काहीही वाटू दे पण निया तर तिला जे आवडतं, जसे कपडे आवडतात तसेच ती घालणार. याचा पुरावा तिचे आधीचे इन्स्टाग्राम फोटो पाहून येतोच.

हे पण वाचा:

खूशखबर! घरबसल्या तुम्ही होऊ शकता The Kapil Sharma Show चा भाग, कपिलने सांगितले काय करावं लागेल!

नशा है नशा! तारक मेहताच्या नव्या एपिसोडवर फॅन्स झाले खूश, व्हायरल झालेत एकापेक्षा एक भन्नाट मीम्स!

टॅग्स :निया शर्माटेलिव्हिजन