Join us  

‘या’ टीव्ही अभिनेत्रीला बिपाशा बसूच्या पतीसोबत करायचे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 11:53 AM

‘कुबूल’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती हिने नुकतेच एका शोदरम्यान म्हटले की, तिला अभिनेता करण सिंग ...

‘कुबूल’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सुरभी ज्योती हिने नुकतेच एका शोदरम्यान म्हटले की, तिला अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्यासोबत लग्न करायचे आहे. होय, आम्ही बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूचा पती करण सिंग ग्रोवरबद्दल सांगत आहोत. कदाचित तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल, पण सुरभीने तिच्या मनातील गोष्ट बोलून दाखविली आहे. त्याचे झाले असे की, सुरभी ‘टेबल फॉर टू’ या चॅट शोमध्ये मैत्रीण सुरभी चंदना हिच्यासोबत गेस्ट म्हणून पोहोचली होती. या शोदरम्यान तिला विचारण्यात आले की, करण सिंग ग्रोवर, जोरावर सिंग आणि वरुण टर्के या तिघांपैकी तुला कोणाला मारायचे, कोणासोबत लग्न करायचे आणि कोणासोबत हुक-अप करणे आवडेल? याचे उत्तर देताना सुरभी ज्योतीने म्हटले की, वरुणला मला मारायचे आहे, जोरावर सिंगसोबत हुक अप करायचे, तर बिपाशा बसूचा पती करण सिंग ग्रोवरसोबत लग्न करायचे आहे. सुरभी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने बिपाशा बसूची नक्कल करताना म्हटले की, ‘ओह माय गॉड, माझा नवरा कुठे आहे?’ सुरभी लवकरच एकता कपूरच्या ‘नागिन’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेत इच्छाधारी नागिनची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेतील अनिता हसनंदानी हीदेखील बघावयास मिळणार आहे. दरम्यान, बिपाशा आणि करणच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. बºयाच काळापासून बिपाशा मोठ्या पडद्यावरून गायब आहे. परंतु पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करीत असते. लवकरच तिने मोठ्या पडद्यावर कमबॅक करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.