Join us  

Bigg Boss11: कोणता स्पर्धक ठरला पहिल्या सिझनपासून ते दहाव्या सिझनपर्यंतचा सगळ्यात वादग्रस्त,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 10:50 AM

'बिग बॉस 11'नवीन पर्व सुरू झाले तरीही स्वामी ओमवर चर्चा होणे थांबता थांबत नाहीय.बिग बॉस11 मध्ये स्मशानात साधना करणाऱ्या ...

'बिग बॉस 11'नवीन पर्व सुरू झाले तरीही स्वामी ओमवर चर्चा होणे थांबता थांबत नाहीय.बिग बॉस11 मध्ये स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिक शिवानी दुर्गाची एंट्री मुळे स्वामी ओम पुन्हा चर्चेत आला आहे. कारण बिग बॉस 10 व्या सिझनमध्ये पहिल्यांदाच स्वामी ओमच्या रूपात एका बाबाला स्पर्धक म्हणून सहभागी करण्यात आले होते.बिग बाॅसच्या घरात स्वंयमघोषित स्वामी ओमची बिग बाॅसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. घरात बेशिस्त वागणे, कंटेस्टंना देण्यात आलेल्या टास्कमध्ये उगाच घुसखोरी करत अडथळा निर्माण करणे, उगाच कंटेस्टंटला भांडणं करायला उपसवणे अशाच प्रकारच्या वागणूकीमुळे कंटेस्टंटही वैतागले होते. वेळोवेळी बिग बॉसही स्वामी ओमला चेतावनी देत.मात्र तरीही 'बिग बॉस विजेता तर मीच होणार बिग बॉसही मला या घरातून बाहेर काढु शकत नाही' अशा गैरसमजखालीच राहत होता. मात्र स्वामी ओमच्या वाढणा-या कुरापतींमुळे कंटेस्टंस मिळून त्याची तक्रार केली.काही स्पर्धकांना तर ओमचे घरात राहणे असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले होते.त्यामुळे  त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.स्वामी ओमच्या कारनामे इथवरचा थांबले नव्हता.एक कटो-यात टायलेट केले होते तेव्हापासून कंटेस्टंट त्याच्यावर खूप नाराज होते. तसेच एका भागात त्याने त्याची चड्डी काढत इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. नॅशनल टीव्हीवर अशा प्रकारे गलिच्छ वर्तवणूक करणारा  ओमने तर यावेळी त्याच्या सगळ्या हरकतीच्या सीमा पर केल्या. ओमने पुन्हा एकदा एका भांड्यात टायलेट करत ते बानी आणि रोहनच्या तोंडावर फेकले त्यामुळे सगळ्यांचा राग अनावर होत त्याला कंटेटंस्टंटनेच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.ओम हे रसिकांचे मनोरंजन करत नसून त्यांचे खरे रूप जगासमोर आणत होते.रसिकांचे मनोरंजन करणे तर दुरच ते त्यांच्या वागणूकीने कोणता संदेश पोहचवण्याचा प्रयत्न करतायेत हे रसिकांनाही उमगले नव्हते.सलमानेही त्याच्या वागणूकीवर ओमला सुनावले होते. मात्र सलमानलाही ओमने जुमालले  नव्हते.त्यामुळे बिग बॉसच्या घरात पहिल्या सिझनपासून ते दहाव्या सिझनपर्यंत आलेला ओम हा सगळ्यात जास्त वादग्रस्त ठरलेला स्पर्धक होता.