Join us

Bigg Boss11: हितेन बनला अर्शी खान तर बिकनीमध्ये प्रियांकने दाखवला जलवा,SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 17:43 IST

बिग बॉसच्या घरात सध्या वेगवेगळे टास्क करत स्पर्धक रसिकांचे मनोरंजन करताना दिसतायेत. नुकताच बिग बॉसकडून स्पर्धकांना लक्झरी बजेट मिळवण्यासाठी ...

बिग बॉसच्या घरात सध्या वेगवेगळे टास्क करत स्पर्धक रसिकांचे मनोरंजन करताना दिसतायेत. नुकताच बिग बॉसकडून स्पर्धकांना लक्झरी बजेट मिळवण्यासाठी एक टास्क देण्यात आला होता. टास्कनुसार स्पर्धकांना एकमेकांना कधी हसवायचे होते तर कधी त्यांच्या मनात राग निर्माण करायचा होता. त्यानुसार स्पर्धकही मोठ्या मेहनतीने आपापल्या आयडियाची कल्पना लढवत टास्क यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानुसार हितेन तेजवानी चक्क अर्शी खानच्या लूकमध्ये स्पर्धकांसमोर आला. अर्शीप्रमाणे ड्रेसिंग आणि हेअर स्टाइल हितेनने केला होता.या अवतारात तो स्पर्धकासमोर येताच सारेच हसत- हसत लोटपोट झाल्याचे पाहायला मिळाले.इतकेच नाहीतर यावेळी टास्क जिंकण्यासाठी प्रियांक शर्मानेही कोणतीच कसर बाकी ठेवली नसल्याचे पाहायला मिळाले.तो तर चक्क बिकनी परिधान करत बिकिनीमध्ये पोज देताना दिसणार आहे.यावेळी हिना खानने तिची बिकनी प्रियांकला दिली होती.(Also Read: Bigg Boss 11 : हिंतेनसोबत फ्लर्ट करणाऱ्या अर्शी खानबद्दल, पत्नी गौरी प्रधानने म्हटले ‘नो प्रॉब्लेम’ !)एकीकडे हास्याचा माहोल तयार होत असताना दुसरीकडे मात्र बिग बॉसच्या घरात किसवरून राडा सुरू आहे.या आठवड्यात शिल्पा शिंदे,लव त्यागी, प्रियांक शर्मा आणि हितेन तेजवानी नॉमिनेट झाले असून स्वत:ला सेफ करण्यासाठी आता ही सर्व मंडळी ख-या अर्थाने गेममध्ये उतरली आहेत. परंतु घरात सध्या वेगळेच प्रकरण गाजत असून त्यावरून स्पर्धकांमध्ये अक्षरश: राडा झाला आहे. आकाश ददलानी शिल्पा शिंदेला वारंवार बळजबरीने किस करीत असल्याने शिल्पाने त्याच्याविरुद्ध आवाज उठविला आहे.वास्तविक आकाश शिल्पाला ‘मां’ म्हणत असल्याने सुरुवातीला हे सर्व काही आई-मुलाच्या पवित्र नात्यात होत असल्याचे तिला वाटत होते.परंतु आकाशकडून बळजबरी केली जात असल्याने शिल्पाला आता आकाशचा स्पर्श नकोसा झाला आहे.मात्र शिल्पाकडून केलेला आरोप आकाशला खटकत असल्याने तो वारंवार या विषयावरून शिल्पावर निशाणा साधत आहे.'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोचा या आठवड्याचा लक्झरी बजेट टास्क खूपच इंटरेस्टिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकाचे आप्तस्वकीय गेल्या गुरुवारी घरात प्रवेश करताना बघावयास मिळाले.त्यामुळे शोमध्ये खूपच भावुक असे वातावरणही झाले होते.