Join us  

मराठमोळ्या थाटात बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल लग्नबंधनात, कोण आहे नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:32 PM

दिव्या अग्रवाल बॉयफ्रेंडसोबत मराठमोळ्या थाटात लग्नबंधनात अडकली आहे. जाणून घ्या तिच्या लाईफ पार्टनरविषयी

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल लग्नबंधनात अडकली आहे. दिव्याने तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरसोबत मराठमोळ्या थाटात लग्न केलं. मंगळवारी मुंबईत दिव्या - अपूर्वने थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं. विशेष म्हणजे दोघांच्या मराठमोळ्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगलीय. दिव्या - अपूर्वच्या लग्नाचे फोटो अल्पावधीत सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

"या क्षणापासून आमची प्रेमकहाणी पुढे सुरु झालीय", असं कॅप्शन देत दिव्या - अपूर्वने लग्नाचे फोटो शेअर केलेत. जांभळ्या रंगाच्या मॅचिंग कपड्यांमध्ये अपूर्व - दिव्या यांचा जोडा एकमेकांना शोभून दिसत होता.  १८ फेब्रुवारीपासून दिव्या - अपूर्वच्या लग्नविधींना सुरुवात झाली. १८ फेब्रुवारीला संगीत तर १९ फेब्रुवारीला अपूर्व - दिव्याची मेहंदी सेरेमनी रंगली. २० तारखेला या दोघांनी पारंपरिक थाटात एकमेकांशी लग्न केलं. दिव्याचा नवरा अपूर्व हा एक रेस्टॉरंंट ओनर असून तो पेशाने इंजिनीयर आहे.

 

 लग्नाआधी अपूर्व  - दिव्याने शानदार कॉकटेल पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला दोघांचेही मित्र - मैत्रीण उपस्थित होते. एजाझ खान, टेरेन्स लुईस, निक्की तांबोळी, आकाश चौधरी, निबेदीता पाल, मोहित हिरानंदानी हे सेलिब्रिटी या पार्टीला उपस्थित होते. सर्वांनी पार्टीत धम्माल केली आणि दिव्या - अपूर्वचं अभिनंदन केलं. डिसेंबर २०२२ मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. 

टॅग्स :बिग बॉसलग्नमराठी