Join us  

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सनी लिओनीने दिला ‘बोल्ड’ टास्क; पाहून नेटकरी म्हणाले, वल्गर..!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 12:26 PM

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये हे काय करतेय सनी लिओनी?  व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

ठळक मुद्देसनी लिओनी ही एमटीव्हीवर प्रसारित होणा-या ‘स्प्लिट्सविला’ या शोची होस्ट आहे. या शोमध्ये सनी स्पर्धकांकडून अशाप्रकारचे अनेक टास्क करवून घेते.

बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो आणि वादांचे जुने नाते आहे. अनेकदा हा शो वादात सापडला आणि म्हणूनच टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. सध्या ओटीटीवरच्या ‘बिग बॉस’ने असाच एक वाद ओढवून घेतलाय. होय, ‘बिग बॉस ओटीटी’मधील  (Bigg Boss OTT) एक टास्क पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अनेक सेलिब्रिटी वेगवेगळे टास्क देताना दिसत आहेत. अशात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी (Sunny Leone) घरात आली. सनीची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री शानदार होणारच होती. पण ती आल्यावर इतका मोठा धमाका होईल, याची कल्पना कुणालाच नव्हती. अशात सनीने बिग बॉसमधील कपल्सला असा काही टास्क दिला की तो पाहून अनेकांचा संताप अनावर झाला.या टास्कमध्ये  स्पर्धकांना एकमेकांच्या जवळ उभ राहून दोघाच्या शरीरांमध्ये  एक नारळ पकडायचा आहे. शिवाय हा नारळ खाली पडू न देता त्यांना डान्स करायचा आहे. तसचं हळू हळू हा नारळ चेह-यापर्यंत आणायचा आहे. या टास्कचा प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून हा विचित्र टास्क नेटक-यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. 

हा कसला घाणेरडा टास्क आहे, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने या ‘वल्गर’ म्हणत आपला संताप व्यक्त केला. हे बिग बॉस आहे की स्प्लिट्सविला असा सवाल एका युजरने केला.एकंदर काय तर सनीने स्पर्धकांना दिलेला टास्क नेटक-यांना आवडला नाही.

सनी लिओनी ही एमटीव्हीवर प्रसारित होणा-या ‘स्प्लिट्सविला’ या शोची होस्ट आहे. या शोमध्ये सनी स्पर्धकांकडून अशाप्रकारचे अनेक टास्क करवून घेते. अनेकदा हे टास्क करताना बोल्डनेसची मर्यादा लांघली जाते.  बिग बॉस सारख्या शोमध्येही तिने असाच टास्क द्यावा, हे अनेक नेटक-यांना आवडले नाही.

टॅग्स :बिग बॉससनी लिओनी