Join us  

Bigg Boss OTT: प्रतिक सहजपल नेहा भसिनला म्‍हणाला, 'तुझे हे प्रेम नाही, आहे फक्त वासना'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 7:30 PM

राकेश बापट व शमिता शेट्टी यांचा गोडवा चाहत्‍यांना आवडला असला तरी आणखी एक कनेक्‍शन लाइमलाइटमध्ये येत आहे, ते म्‍हणजे नेहा भसिन व प्रतिक सहजपल.

अवघ्‍या तीन आठवड्यांमध्‍ये 'बिग बॉस ओटीटी' वादविवाद, ड्रामा व रोमांसच्‍या संदर्भात ओव्‍हर दी टॉप ठरला आहे. वर्षानुवर्षे अनेक नाती 'बिग बॉस' घरामध्‍ये बहरली आहेत आणि हा सीझन देखील त्‍यासंदर्भात अपवाद नाही. राकेश बापट व शमिता शेट्टी यांचा गोडवा चाहत्‍यांना आवडला असला तरी आणखी एक कनेक्‍शन प्रकाशझोतात येत आहे, ते म्‍हणजे नेहा भसिन व प्रतिक सहजपल.

मागील आठवड्यामध्‍ये प्रतिकने अक्षरा सिंगसोबतचे कनेक्‍शन तोडून नेहासोबत नवीन कनेक्‍शन सुरू केले. शोमध्‍ये दोघेही जिवलग मित्र बनले आहेत. पण गायिकेला संगीतकार समीर उद्दीनसोबतच्‍या विवाहाबाबत कोणतीच चिंता नाही.शोच्‍या मागील एपिसोडमध्‍ये नेहा प्रतिकला सांगताना दिसते की, त्‍यांच्‍यामध्‍ये संगीताप्रती असलेली समान आवड आणि त्‍यापेक्षा अधिक असू शकणाऱ्या तणावामुळे केवळ नाते असू शकत नाही.

ती म्‍हणाली, ''तू फक्‍त तुझ्या अॅब्‍ससह प्रभावित करतोस, मी हे दररोज करू शकत नाही, आपल्‍यामध्‍ये फक्‍त हेच कनेक्‍शन नसू शकते.'' याबाबत प्रत्‍युत्तर देत प्रतिक म्‍हणाला, ''तुझे हे प्रेम नाही, फक्‍त वासना आहे.''

निया शर्मा बिग बॉस ओटीटीमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप खूश आहे. निया शर्मा 1 सप्टेंबरपासून बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहे. त्यामुळे घरातील वातावरण बदलणार नक्की. ती आता तिच्या बोल्डनेस आणि बेधडक अंदाजाने सर्वांचे होश उडवणार आहे. बिग बॉसच्या घरात निया कोणाची मैत्रिण बनते आणि कोणाची शत्रू हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसनिया शर्मा