Join us  

Bigg Boss Marathi Winner : मेघा धाडे म्हणते,हा विजय माझ्या चाहत्यांचा! वाचा, विजयानंतरची तिची पहिली खास मुलाखत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 11:35 PM

मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली. विजयानंतर मेघाने लोकमतशी खास संवाद साधला़ यावेळी तिच्यासोबत झालेली काही प्रश्नोत्तरे...

मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली. विजयानंतर मेघाने लोकमतशी खास संवाद साधला. यावेळी तिच्यासोबत झालेली काही प्रश्नोत्तरे...

प्रश्न : मेघा, हा विजय कुणाला समर्पित करशील?मेघा- आजचा विजय मी माझ्या तमात चाहत्यांना, माझ्या मायबाप प्रेक्षकांना समर्पित करेल. त्यांच्याचमुळे मी इथे पोहोचलीय. माझ्या आजच्या विजयात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर बिग बॉसची ट्राफी माझ्या हातात नसती.प्रश्न - आज प्राईज मनीशिवाय तू या घरातून काय घेऊन जाशील?मेघा- खूप साऱ्या आठवणी़ सगळे सदस्य, त्यांची मैत्री, जिवा-भावाचे मित्र हे सगळे मी इथून घेऊन जातेय. शिवाय प्रेक्षकांचे पे्रमही मी इथून घेऊन जातेय.प्रश्न- या घरात तुझ्यात झालेला सगळ्यात ठळक बदल कोणता सांगशील?मेघा - मला या घराने खूप काही शिकवले. मी आत्मपरिक्षण करायला शिकले, हा माझ्यातील सगळ्यांत मोठा बदल. याशिवाय या घरातील माणसांनी मला अनेक टिप्स दिल्या आहेत. त्याही मी अंगी बाणवल्या आहेत.प्रश्न- बिग बॉस मराठीचे पहिले पर्व जिंकल्यानंतर करिअरला किती फायदा होईल, असे तुला वाटतेय.मेघा- ते आत्ताच सांगू शकणार नाही़ पण होईल, इतके मात्र मी नक्की सांगेल़ बिग बॉसनंतर काही बंद झालेले मार्ग माझ्यासाठी उघडतील, याची मला खात्री आहे.

 

टॅग्स :बिग बॉस मराठी