Join us  

Bigg Boss Marathi Season 2 Finale : ही गोष्ट पाहिल्यावर वीणाला अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:29 AM

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी कालचा दिवस खूपच अविस्मरणीय ठरला.

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी कालचा दिवस खूपच अविस्मरणीय ठरला. काल टॉप 6 मध्ये पोहचलेल्या किशोरी, नेहा आणि शिव या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची एव्ही दाखविण्यात आली. सदस्य आपला प्रवास बघून भावुक तर झालेच पण त्यांना अश्रु अनावर झाले... बिग बॉस यांनी ज्या शब्दांत सदस्यांचे कौतुक केले ते त्यांच्यासाठी खास होते. आज वीणा जगताप, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला हा खास क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

 वाईल्ड कार्ड म्हणून आरोहची घरामध्ये एंट्री झाली आणि त्याने घरातील सदस्यांना आपलेसे केले आणि हेच प्रेक्षकांना खूप आवडले असे म्हणत आरोहचे बिग बॉस यांनी कौतुक केले... अनेक वर्ष टेलिव्हीजन माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्यावर ती सज्ज होती रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करायला आणि ती अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप... वीणा हे ऐकून जरा भावुक झाली. शिवानी, आरोह आणि वीणा या तिघांसाठी देखील हा क्षण खूप महत्वाचा आणि अनमोल असणार आहे हे नक्की

टॅग्स :बिग बॉस मराठीवीणा जगताप