अभिनयाबरोबरच सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी. ‘गुलदस्ता’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘अफलातून’ अशा अनेक मराठी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली तेजस्विनी बिग बॉस मराठीतून घराघरात पोहोचली. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात ती सहभागी झाली होती. गेली कित्येक वर्ष मनोरंजनविश्वात कार्यरत असलेल्या तेजस्विनीला ‘बिग बॉस’मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तेजस्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने करिअर, वैयक्तिक आयुष्य अशा विविध मुद्यांवर भाष्य केलं. या मुलाखतीत तेजस्विनीने सध्याच्या राजकारणावरही अगदी परखडपणे तिचं मत मांडलं.
तेजस्विनीने इसापनीती या युट्यूब चॅनेलच्या ‘छापा काटा’ शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत राजकारणावर भाष्य करताना तेजस्विनी म्हणाली, “माझी आई खूप राजकारण बघते. पण, फारशी या सगळ्या गोष्टीत पडत नाही. सध्याचं राजकारण मला खूप हास्यास्पद वाटतं. आज इतक्या समस्या आहेत. पण, राजकारणी एकमेकांवर फक्त टीका करत आहेत. तुम्ही इकडून तिकडे उड्या मारताय, ठीक आहे. तुम्ही एका पक्षात आहात असा विचार करुन तुम्हाला वोट करणारे आम्ही मूर्ख आहोत. कुठलाहा राजकीय कार्यक्रम बघा ते शिक्षण, शेतकरी याबद्दल काहीच बोलत नाहीत. हा किती चुकीचा तो किती चुकीचा आहे, हेच ते बोलत असतात.”
दोन वर्षांतच मोडलेला मसाबा गुप्ताचा संसार, लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी ठरवतात नीना गुप्ता
“विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणालेले आता मुख्यमंत्री बदलणार. त्यानंतर लगेच सत्ताधारी पक्ष म्हणतो, त्यांच्याकडे बोलायला काही नाही. संभाजी नाव ब्राह्मणांमध्ये नसतं, असं भुजबळ म्हणाले होते. त्यावरुन पण, यांना आता मंत्रीपदावरुन काढा वगैरे सगळं सुरू झालं. पण, या सगळ्यात पाऊस, पाणी, शिक्षणपद्धती, शाळा हे सगळं कुठे आहे? मी रोज सकाळी आणि संध्याकाळी बातम्या बघते. पण, त्यातही हेच सगळं सुरू असतं. मी बातम्या नाही बघितल्या, तर मग आई रात्री कॉल करून दिवसभरातील सगळ्या अपडेट्स देते,” असंही पुढे तेजस्विनीने सांगितलं. तिने सध्याच्या राजकारणाबाबत केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे.
Video : "...झुकेगा नही साला", पाठकबाईंच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात राणादाचा 'पुष्पा'स्टाइल उखाणा
तेजस्विनीने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. गेल्याच महिन्यात ‘अफलातून’ चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटात ती महिला पोलिसाच्या भूमिकेत होती. सध्या तेजस्विनी स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.