Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg boss marathi: 'ग्रुपमध्ये खेळू नकोस"; गायत्रीला भावाने दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 18:39 IST

Bigg boss marathi:बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये गायत्रीला भेटण्यासाठी तिचा भाऊ, वहिनी आणि भाचा आले होते. यावेळी  दादाला पाहिल्यावर गायत्री भावूक झाली आणि रडायला लागली.

'तुला पाहते रे' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. सध्या गायत्री 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली आहे. उत्तम अभिनयशैलीमुळे ओळखली जाणारी गायत्री सध्या तिच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत येत आहे.  अलिकडेच या शोमध्ये गायत्रीच्या भावाने हजेरी लावली होती. यावेळी त्याने तिला एक मोलाचा सल्ला दिला.

बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये गायत्रीला भेटण्यासाठी तिचा भाऊ, वहिनी आणि भाचा आले होते. यावेळी  दादाला पाहिल्यावर गायत्री भावूक झाली आणि रडायला लागली. यावेळी तिचं सांत्वन करत गायत्रीच्या भावाने तिला जिंकण्यासाठी काय करावं लागेल हे सांगितलं.

आईने निरोप दिलाय कोणासोबत भांडण करु नकोस, नाही तर घरात घेणार नाही. सगळ्यांसोबत नीट रहा. आणि, यापुढे ग्रुपमध्ये खेळू नको. त्याऐवजी स्वतंत्र एकटी खेळायला लाग. स्वतःचा विचार, मत मांडून आणि त्यानुसार खेळं, असं गायत्रीच्या भावाने सांगितलं.

दरम्यान, गायत्रीच्या कुटुंबीयांना पाहिल्यावर घरातील अन्य स्पर्धकही प्रचंड भावूक झाले होते. सोबतच तिच्या लहानग्या भाच्याला पाहून प्रत्येकाने त्याला खेळवण्याचा प्रयत्न केला. सध्या बिग बॉसच्या घरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीगायत्री दातारटिव्ही कलाकार