Join us

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात गरबा नाईटमध्ये सदस्यांना मिळणार सरप्राईज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:10 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये झालेल्या वादासोबतच काल धम्माल मस्ती देखील बघायला मिळाली.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये झालेल्या वादासोबतच काल धम्माल मस्ती देखील बघायला मिळाली. अपूर्वा आणि प्रसादमधील वाद काल विकोपाला गेला, दोघे एक मतावर येऊ शकले नाही, दोघेही आपल्या मुद्द्यावर अडून राहिल्याने साप्ताहिक कार्यातील पहिले उपकार्य अनिर्णित राहिले.

कालपासून घरामध्ये सुरु झाले आहे “चान्स पे डान्स” हे उपकार्य. किरण माने आणि निखिल राजेशिर्के या कार्याचे संचालक आहेत. काल अक्षय केळकर आणि प्रसाद यांच्या सादरीकरणाने खूपच धम्माल आणली. आज सदस्य कोणकोणत्या गाण्यावर डान्स करतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

आज विकास आणि यशश्री 'वो लडकी आख मारे' या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत. तर आज घरामध्ये रंगणार आहे BB गरबा नाईट. यामध्ये सदस्य एक से बडेकर एक गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहेत. सदस्य या गरबा नाईटमध्ये डान्सचा मनसोक्त आनंद लुटता दिसणार आहेत. घरामध्ये BB गरबा नाईटचा जल्लोष तर असेलच पण सदस्यांना एक खास सरप्राईझ देखील मिळणार ? काय असेल ते सरप्राईझ ? बघूया आजच्या भागामध्ये. तसेच चान्स पे डान्स या उपकार्यात कोण बाजी मारणार हे देखील आज कळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठी