Bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचे आतापर्यंत तीन सीझन झाले आहेत. मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरेनं बाजी मारली होती. तिसऱ्या सीझनमध्ये विशाल निकमनं ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. आता बिग बॉस मराठीचे चौथा सीझन 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आहे. 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे, चौथा सीझन सुरु होईन पाच दिवसही झाले नाहीत तोवर घरात वाद आणि भांडणांना सुरुवात झाली. आता बिग बॉस च्या घरात 'पप्पू' कोण आहे हे लवकरच उघड होणार आहे.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, अक्षय, रुचिरा, रोहीत कोणा एका सदस्यबद्दल गॉसिप करताना दिसणार आहेत. या घरामध्ये काही दिवसांतच ग्रुप होतात आणि कट आखले जातात. आज यांच्यात देखील चर्चा सुरु आहे, ज्यात अपूर्वाचं म्हणणं आहे "माझी तर मनापासून इच्छा आहे किचनचं कामं ना पप्पूकडे आलं पाहिजे”. त्यावर अक्षय म्हणाला, चूक आहेस तू साफ सफाई देऊया... कसं आहे बघ मला असं वाटतं, जेवण आहे ना ते उत्तम व्यक्तीलाच देऊयात. सगळयांचं म्हणणं आहे भांडी घाश्या बनवू त्याला. त्यावर अपूर्वा, रोहित यांचे कंमेंट सुरु झाले, कोण आहे हा पप्पू कळेलच लवकर ...
अपूर्वा म्हणाली, " हा माणूस येतो, डिनर टेबलवर खातो आणि निघून जातो...अजून सदस्यांमध्ये काय काय चर्चा झाल्या ? कोण काय काय बोलं ? कोणाचे राडे झाले ? कोणी घरात धम्माल मस्ती केली? कसा पार पडला टास्क ? हे आजच्या भागात कळणार आहे.