Join us

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात या सदस्यांमध्ये झाले कडाक्याचे भांडणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:44 IST

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन रंजक वळणावर आला आहे.

बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास जसजसा पुढे सरकत आहे, तसं तसे अवघड आणि अत्यंत कठीण टास्क पुढे येत आहेत. आता तर सदस्यांना डोकं, ताकद सगळंच वापरावं लागणार आहे. आज बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले आहे. आणि त्याचसाठी तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी खेळी आखताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खरंच अमृता धोंगडे आणि अक्षय केळकरमध्ये मेकअप बॉक्स वरून मोठा राडा होणार आहे.  अमृता आणि अक्षयमध्ये मेकअप बॉक्सवरून चांगलाच वाद होणार आहे. 

अमृताने अक्षयला बजावून सांगितले पाय नको मारुस. मेकअप आहे माझा...अक्षय म्हणाला, पाय मुद्दाम मारला का तुझ्या मेकअपला ? अमृता म्हणाली, मी सांगून देखील पाय अजून तिथेच आहे तुझा? अक्षयचे यावर म्हणणे आहे मी मुद्दाम मारला का? पाय मारला हे वाक्य म्हणू नकोस ... अमृता म्हणाली, मग काय म्हणू ? दुसरं वाक्य काय आहे ? 

अक्षय म्हणाला, पाय लागला असं म्हण... तुझ्यासारखा मूर्ख आहे का मी? चिटर कुठली रडी... आणि हे भांडणं असंच सुरू राहिले... अमृता म्हणाली, तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. अक्षय म्हणाला, तेच म्हणणं आहे खूप फरक आहे आपल्यात म्हणूनच तुझ्याशी वाद नाही घालतं आहे. बघूया अजून काय झालं घरात कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद हे आजच्या भागात कळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठी