Join us  

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट, मोठं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:53 AM

Bigg Boss Marathi 4: आता तेजस्विनी लोणारी(Tejaswini Lonari)चा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे.

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. मागील आठवड्यात समृद्धी जाधव (Samruddhi Jadhav) घराबाहेर पडली होती. आता तेजस्विनी लोणारी(Tejaswini Lonari)चा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे.

तेजस्विनी लोणारीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला खेळातून बाहेर पडायचे की बिग बॉसच्या घरात राहायचे, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे बिग बॉसने सांगितले होते.

बिग बॉस मराठीच्या घरात आज असे घडले ज्यामुळे सगळ्या सदस्यांच्या अश्रूचा बांध फुटला. तेजस्विनीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तिला घर सोडून जावे लागले. बिग बॉस यांनी तेजस्विनीला कंफेशन रूममध्ये बोलावले. तेजस्विनीला सांगण्यात आले की, तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता, या क्षणी सोडावे लागेल. हे ऐकताच घरात शांतता पसरली. किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे यांना अश्रू अनावर झाले. कोणाचाच विश्वास यावर बसत नव्हता. रहिवासी संघावर नेम प्लेट लावण्यावरून जे तेजस्विनी आणि राखी मध्ये वाद झाले होते ते आपल्या सगळ्यांनाच आठवत आहेत. तेजस्विनीने जेव्हा तिच्या नावाची पाटी काढली तेव्हा राखी म्हणाली "ही जागा तुझी आहे". आता पुढे काय घडणार हे पाहावे लागेल.

टॅग्स :बिग बॉस मराठी