Join us

Bigg Boss Marathi 4 : नॉमिनेशनच्या प्रक्रियेवरुन तेजस्विनी आणि प्रसादमध्ये राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:59 IST

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आटली बाटली फुटली हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आटली बाटली फुटली हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये रोहित, प्रसाद, मेघा आणि त्रिशूल घरातील उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार आहेत. रोहित शिंदे याने निखिल राजेशिर्के याला नॉमिनेट करणार असून त्याचे कारण निखिलला अमान्य असल्याचे त्याने सांगितले. रोहितने स्पष्टीकरण देखील दिले "its Not a Groupism". या  नॉमिनेशन प्रक्रियेबाबत आज प्रसाद आणि रुचिरामध्ये चांगलीच चर्चा रंगणार आहे. 

आता नक्की ते काय चर्चा करणार आहेत ते कळेलच. दुसरीकडे, नॉमिनेशनच्या प्रक्रियेमुळे तेजस्विनी आणि प्रसादमध्ये खटके उडायला सुरुवात होणार आहे.

तेजस्विनी प्रसादाला म्हणाली, "तू जे काय बनवणार आहेस ते positivity ने बनव, कटकट नको करुस, सांगकाम्या आहेस तू... आणि वाद वाढतच गेला... त्यावर अपूर्वाने देखील तिचे मत मांडले, "ह्याला हे सांगू नको, त्याला ते सांगू नको... याला काहीच सांगायचे नाही. 

टॅग्स :बिग बॉस मराठी