Join us

Bigg Boss Marathi 3 : टास्क नव्हे यंदा स्पर्धकामध्ये रंगणार रांगड्या मातीतील खेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 18:30 IST

Bigg Boss Marathi 3 : 'बिग बॉस ३' मध्ये कदाचित स्पर्धकांना मराठी मातीशी निगडीत खेळांचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देयंदाच्या पर्वात खासकरुन मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि एकंदरीतच मराठीशी निगडीत गोष्टींवर भर दिला जाणार आहे.

छोट्या पडद्यावरील बहुप्रतिक्षीत ठरत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. यंदा या शोचं तिसरं पर्व रंगणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या शोविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा शो अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, अद्यापही या शोमध्ये कोणते कलाकार झळकणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यातच आता यंदाच्या पर्वात अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे हा शो जिंकण्यासाठी देण्यात येणारे टास्क. यंदाच्या पर्वात टास्कऐवजी स्पर्धकांना काही नवीन गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे.

'बिग बॉस मराठी' हा शो कायमच स्पर्धकांमधील वाद आणि त्यांना देण्यात येणाऱ्या चित्रविचित्र टास्कमुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी स्पर्धकांना एका नव्या दिव्यातूनच जावं लागणार आहे. दरवेळी असणारे टास्क यंदाच्या स्पर्धकांना अनुभवता येणार नाहीत. तर, त्याऐवजी त्यांना टास्क म्हणून काही मातीतील खेळ दिले जाणार असल्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi 3 : यंदाच्या पर्वात विकेंडचा डाव नाही?

यंदाच्या पर्वात खासकरुन मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि एकंदरीतच मराठीशी निगडीत गोष्टींवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस ३' मध्ये कदाचित स्पर्धकांना मराठी मातीशी निगडीत खेळांचा सामना करावा लागणार आहे, अशी शक्यता दिसून येते.

दरम्यान, या पर्वामध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या शोविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच या टास्कविषयीदेखील ही नवी चर्चा रंगली आहे. मात्र, हा शो सुरु झाल्यावरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी