Join us

Big Boss Marathi 3 : विशालची ‘सौंदर्या’ आहे तरी कोण? लवकरच खुलासा होणार ना भाऊ...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 13:36 IST

Big Boss Marathi 3 : विशालची ‘सौंदर्या’ कोण हा प्रश्न  अख्ख्या महाराष्ट्राला पडला आहे आणि विशाल लवकरच याचा खुलासा करणार आहे.

Big Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी 3’मधील  डॅशिंग, हँडसम चेहरा म्हणजे विशाल निकम (Vishal Nikam). विशाल तसा कायम चर्चेत असतो. आता चर्चा सुरू झालीये ती त्याच्या लग्नाची. होय,‘बिग बॉस मराठी 3’मधून बाहेर पडताच विशाल बोहल्यावर चढणार असं मानलं जातंय. आता विशाल लग्न करणार म्हटल्यावर ‘सौंदर्या’ची चर्चा तर होणारच.  विशालची ‘सौंदर्या’ कोण हा प्रश्न  अख्ख्या महाराष्ट्राला पडला आहे आणि विशाल लवकरच याचा खुलासा करण्याची शक्यता आहे.

‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात नुकतीच पत्रकार परिषद झाली. या पत्रपरिषदेत विशालला हटकून सौंदर्याबद्दल विचारण्यात आलं. सौंदर्या नक्की आहे का? सौंदर्या हेच तिचं खरं नाव आहे का? असे प्रश्न विशालला केले गेलेत.

यावर विशालची कळी चांगलीच खुलली. हो, सौंदर्या ख-या आयुष्यात आहे. तिच्यामुळेच मी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात राहू शकलो. मी आत आणि ती बाहेर होती. पण तिच्यामुळेच मला शक्ती मिळते. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर मी नक्की तिचं नावं सागेल आणि सर्वांशी तिची ओळख करून देईल, असं विशाल म्हणाला. इतकंच नाही तर विशालनं पत्रपरिषदेत उपस्थित पत्रकारांना लग्नाचं निमंत्रणही दिलं.

मध्यंतरी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात फॅमिली वीक साजरा झाला होता आणि यादरम्यान विशालच्या  सौंदर्याची चर्चा सुरु झाली होती.  आई आणि धाकटी बहीण बिग बॉसच्या घरात विशालला भेटायला आली, तेव्हा विशाल सौंदर्याच्या आठवणीत व्याकूळ झालेला दिसला होता.‘ तू तिला फोन कर, तिच्याशी बोल’, असं तो आईला म्हणाला होता आणि त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सौदर्यांचा फोन आला होता.., असं आईनं त्याला सांगितलं होतं. बहिणीनेही सौंदर्या हे नाव घेतलं होतं.

बिग बॉसच्या घरात विशाल अनेकदा सौंदर्याशी एकटाच बोलताना दिसला होता. साहजिकच ही सौंदर्या कोण? हा प्रश्न चाहत्यांना सतावू लागला होता. ही सौंदर्या कोण, कुठली, कशी दिसते, विशालची खास मैत्रिण आहे की आणखी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. बिग बॉस संपल्यावर याचं उत्तर मिळणार, अशी अपेक्षा करायला आता हरकत नाही.

टॅग्स :बिग बॉस मराठी