Join us

Bigg Boss Marathi 3: कोणी चालतंय गुडघ्यावर तर कोणी घालतंय साष्टांग नमस्कार, घरात नेमकं चालंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:38 IST

हुकूमशहा देत असलेले कार्य या सदस्यांना करावे लागणार आहे

बिग बॉस मराठीचे घरात रोज नवे टास्क होत असतात. हे टास्क खेळताना अनेकवेळा घरातील सदस्यांची कसोटी लागते. काल बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 3)  घराचे रूपांतर लिलिपुट नगरात झाले होते.  घरातील ८ सदस्य त्या नगरातील जनता असणार आहेत तर नवे आलेले सदस्य हुकूमशहा. आता हे हुकूमशहा देत असलेले कार्य या सदस्यांना करावे लागणार आहे पण ते पूर्ण करताना त्यांची मात्र कसोटी लागणार आहे. त्यांची दमछाक होतं आहे हे दिसून येतं आहे. कोणी लोटांगण घालते आहे तर कोणी वारा तर कोणी गुडघ्यावर चालते आहे तर कोणी साष्टांग नमस्कार घालतं आहे. तृप्तीताईंचे म्हणणे आहे त्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे.

 तृप्तीताईंनी सोनालीला कार्यामधून केले बाद कार्यामध्ये आज सोनाली आणि गायत्रीला खावी लागणार आहेत कारली आणि ते खात असताना विचित्र तोंड करण्यास मनाई आहे. तसेच ते हात न लावता खायची आहेत. हे कार्य कसे पार पाडतील, हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहावा लागेल. तृप्तीताईंनी सोनालीला कार्यामधून बाद केले आणि तिला उठाबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी