Join us  

Bigg Boss Marathi 2 : ... तर माझं पण नाव सुरेखा पुणेकर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 1:38 PM

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. नॉमिनेशन टास्कसाठी होणारी भांडण, मैत्री, प्रेम अशा गोष्टी घरात पाहायला मिळत आहेत.

ठळक मुद्देमाझं वय काढाल तर याद राखा अशी तंबी सुरेखा पुणेकरांनी घरातील सदस्यांना दिली आहे. नेहा, रुपाली आणि किशोरी यांनी आपतकालीन परिस्थितीत कोणासोबत राहू शकणार नाही असं विचारल्यावर सुरेखा पुणेकर यांचं नाव सांगितलं.'माणसांनी जे खरं कारण आहे ते सांगून मोकळं व्हावं, घरातील सर्व सदस्यांनी या शंभर वर्षाच्या आहेत. बिग बॉसमध्ये उगच आल्यात असं एकदाचं म्हणून टाका' असं म्हणत सुरेखा ताईंनी आपला राग व्यक्त केला.

मुंबई - बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. नॉमिनेशन टास्कसाठी होणारी भांडण, मैत्री, प्रेम अशा गोष्टी घरात पाहायला मिळत आहेत. मंगळवारी (2 जुलै) प्रदर्शित झालेल्या भागात बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांची चांगलीच घाबरगुंडी उडालेली पाहायला मिळाली. घरामध्ये सायरन वाजला तसेच घरातील लाईट्स ऑन-ऑफ झाले. बिग बॉसने घराबाहेर आपतकालीन परिस्थिती ओढावल्याची माहिती घरातील सदस्यांना दिली. 

घरातील सदस्यांना एका बंद खोलीत जाण्याचा आदेश दिला. मात्र कोणतीही आपतकालीन परिस्थिती ओढावली नसून हा एक नवीन टास्क असल्याची माहिती बिग बॉसने त्यानंतर सदस्यांना दिली. आपतकालीन परिस्थितीत आपल्यासोबत कोणता सदस्य असलेला आवडेल तर कोणासोबत राहू शकणार नाही अशा दोन सदस्यांची नावं टास्कमध्ये सांगायची होती. या टास्कदरम्यान सुरेखा पुणेकर इतर स्पर्धकांवर संतापल्या. माझं वय काढाल तर याद राखा अशी तंबी सुरेखा पुणेकरांनी घरातील सदस्यांना दिली आहे. 

नेहा, रुपाली आणि किशोरी यांनी आपतकालीन परिस्थितीत कोणासोबत राहू शकणार नाही असं विचारल्यावर सुरेखा पुणेकर यांचं नाव सांगितलं. वयाचं कारण दिल्यामुळे सुरेखा ताई चिडल्या. 'सर्वांना माझ्या वयाचा प्रॉब्लेम आहे. नेहमी माझ्या वयाचा मुद्दा काढला जातो. किशोरी आणि माझ्यात फक्त एका वर्षाचं अंतर असून देखील मला माझ्या वयावरून बोललं जातं. मी बारा महिने फिरत असते. अजूनही लोकांची चाहती आहे. त्यामुळे माझं आता वय काढाल तर शिव्या देईन. शिव्या नाही दिल्या तर माझं पण नाव सुरेखा पुणेकर नाही' असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे. 

'माणसांनी जे खरं कारण आहे ते सांगून मोकळं व्हावं, घरातील सर्व सदस्यांनी या शंभर वर्षाच्या आहेत. बिग बॉसमध्ये उगच आल्यात असं एकदाचं म्हणून टाका' असं म्हणत सुरेखा ताईंनी आपला राग व्यक्त केला आहे. सुरेखा पुणेकर चिडलेल्या पाहून घरातील इतर सदस्यांनी शांत राहणच पसंत केलेलं पाहायला मिळालं. या आठवड्यात माधव बिग बॉसच्या घराचा कॅप्टन आहे. तर हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली माडे, सुरेखा पुणेकर आणि किशोरी शहाणे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 

बिग बॉस मराठी 2 : घरात जाणार पहिल्या सीझनचे 'हे' सदस्य

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज खास अतिथी येणार आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळाले. त्यातील सदस्य, त्यांची मैत्री, त्यांनी केलेले टास्क अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आणि आता त्याच पर्वातील काही सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहेत. आज घरामध्ये येणार पहिल्या सिझनमधील सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा पुन्हा त्याच आठवणी, गप्पा, भांडण, टास्क त्यांना आठवणार हे नक्की. घर तेच आहे, फक्त सदस्य वेगळे आहेत... ते दिवस पुन्हा एकदा त्यांच्या नजरेसमोरून जाणार. ते टास्कमध्ये असणार खरं पण, टास्क ते समोरून बघणार आहेत, घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेव्हा बघूया पहिले पर्व गाजवलेले हे सदस्य किती मज्जा मस्ती करणार, काय टास्क देणार, आणि कोणता सदस्य त्यांचे मनं जिंकणार.

टॅग्स :बिग बॉस मराठीसुरेखा पुणेकरकलर्स मराठी