Join us  

बिग बॉस मराठी २ – शिव ठाकरे आणि अभिजीत केळकर सेफ कोण कोण झाले नॉमिनेट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 3:20 PM

या घराचा कॅप्टन असल्याने अभिजीत केळकर या नॉमिनेशन कार्यापासून सेफ आहे. तर नेहा आणि वीणा या टास्कमध्ये जाणारी पहिली जोडी ठरली आणि दोघींनी सुध्दा एकमेकींना तिकीट देण्यास साफ नकार दिला.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “हाफ तिकीट हे नॉमिनेशन कार्य रंगले. बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाच्या उत्तरार्धाची सुरुवात आता झाली आहे. आणि आता यापुढे प्रवास अजूनच खडतर होत जाणार आहे, त्यामुळे सदस्यांनी त्यांची घरात रहाण्याची पात्रता सिद्ध करणे तितकेच जिकरीचे बनले आहे. या घराचा कॅप्टन असल्याने अभिजीत केळकर या नॉमिनेशन कार्यापासून सेफ आहे. तर नेहा आणि वीणा या टास्कमध्ये जाणारी पहिली जोडी ठरली आणि दोघींनी सुध्दा एकमेकींना तिकीट देण्यास साफ नकार दिला. 

तर दुसरी जोडी हिना आणि शिवची होती. हिनाने शिव आणि तिच्यामध्ये झालेले सगळे वाद विसरून त्याला तिच्याकडचे तिकीट देऊन सेफ केले. तर किशोरी आणि वैशालीमध्ये वाद रंगला. तुमचा मुद्दाच मला पटत नाही असे वैशालीने किशोरीताईना सांगितले. आणि दोघीसुध्दा नॉमिनेशनमध्ये गेल्या. त्यानंतर माधव आणि रुपालीमध्ये देखील कोणीच कुणाला तिकीट न दिल्याने दोघीही नॉमिनेशन मध्ये गेले. त्यामुळे वीणा जगताप, रुपाली भोसले, किशोरी शहाणे, माधव देवचके, हिना पांचाळ, नेहा शितोळे आणि वैशाली म्हाडे या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले.

अभिजीत केळकरला येतेय बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेल्या या सदस्याची आठवण

बिग बॉस मराठीच्या घरात राहाताना त्‍याच्‍या बालपणीच्‍या केअरटेकरची आठवण येत असे. त्यांच्यासोबत सुरेखा ताईंची तुलना करत तो म्‍हणतो, ''मी ज्‍यांच्‍याकडे लहानाचा मोठा झालो ना त्‍या एक्‍झॅक्‍ट सुरेखा ताई यांच्यासारख्‍याच आहेत. मी फार बोललो नाही कधी त्‍यांच्‍याविषयी. पण अटॅचमेंट होती मला. आई बाबा जॉबला जायचे, त्‍यांच्‍याकडेच असायचो आम्‍ही. माझ्यासाठी त्‍यांनी खूप केलं आहे. मी कोणाचा मुलगा आहे हे चाळीतल्‍या लोकांना देखील कळायचं नाही. माझी हौस, मौज सगळे काही ते पुरवायचे. मला काय हवं असेल ते लगेचच मला आणून द्यायच्या.'' 

टॅग्स :बिग बॉस मराठीशीव ठाकरे