Join us  

बिग बॉस मराठी २ : घरामध्ये रंगणार 'एकच फाईट वातावरण टाईट' हे कार्य, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 3:40 PM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य रंगले होते. तर माधव देवचकेला घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान मिळाला. या आठवड्यात उत्तम खेळाडू होण्याचा मान शिवला मिळाला.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य रंगले होते. तर माधव देवचकेला घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान मिळाला. या आठवड्यात उत्तम खेळाडू होण्याचा मान शिवला मिळाला. कोण घरात राहणार आणि कोण बाहेर जाणार? हे विकेंडचा डावमध्ये पाहायला मिळणार आहे. 

रुपाली, वैशाली, हीना, सुरेखाताई आणि किशोरी शहाणे यामध्ये कोणाला आज घर सोडावे लागणार हे आजच्या भागामध्ये कळलेच. आज घरामध्ये सदस्य एकमेकांसाठी गाणी म्हणणार आहेत. हिनाने शिव आणि वीणा साठी आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हे गाण म्हंटल. तर किशोरी शहाणे यांनी रुपालीसाठी आणि वैशालीने शिव आणि अभिजीतसाठी गाण सादर केले. तर आजच्या भागामध्ये महेश मांजरेकर सदस्यांना त्यांच्या मनातील राग काढण्याची एक संधी सदस्यांना देणार आहेत “एकच फाईट वातावरण टाईट”. तर बघुया कोण कोणावर राग काढत ? कोणाच्या मनामध्ये कोणाबद्दल काय आहे ? तर माधवच्या चाहत्याने चुगली केली कि, वीणाने रुपालीकडे असे सांगितले आहे कि, आता माधवला टार्गेट करुया आणि मी कॅप्टन झाले कि, माधवला किचन साफ करायला लावू...” यावर माधव आणि वीणाने काय सांगितले हे आजच्या भागामध्ये कळेलच. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ चा WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

महेश मांजरेकर यांनी WEEKEND चा डावमध्ये काल नेहाला खडेबोल सुनावले. नेहाने 'कॅप्टनशीप' आणि 'अतिथी देवो भव:' या टास्कमध्ये ज्याकाही चुका केल्या, ज्याप्रकारची तिची वागणूक घरामध्ये आहे याबद्दल तिला खडसावले. परागची जागा घरामध्ये घेतली आहे आणि तू हुकमशहासारखी वागते आहे असे त्यांनी तिला सांगितले. “मी माधवला दोनच मिनिट सहन करू शकते” असे सारखे बोलणे अत्यंत चुकीचे आहे, तुला असं कोण म्हणाला तर आवडेल का ? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी वीणाला विचारला.

यावरून वीणाने माधवची माफी मागितली... अभिजीत, माधव, वैशाली, वीणा सगळ्यांनीच नेहा कुठे चुकली हे महेश मांजरेकरांना सांगितले... त्यावर महेश मांजरेकरांनी वेळीच सावध हो असे देखील तिला बजावले.

आता बघूया नेहाच्या वागण्यामध्ये काही बदल होतो का ? प्रगती पुस्तकाच्या टास्कवरून देखील अभिजीत, वैशाली, माधव आणि नेहाने विरुध्द टीमच्या सदस्यांना दिलेल्या मार्कवरून देखील “इतक्या छोट्या मनाचे नसावे” असे मांजरेकर त्यांना बोलले.

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर शीव ठाकरेवीणा जगताप