Join us  

आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बिग बॉस मराठी २ चा हा स्पर्धक घरोघरी टाकायचा पेपर, वाचा त्याचा स्ट्रगल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 1:33 PM

बिग बॉस मराठी २ च्या घरात गप्पा मारत असताना एक स्पर्धक त्याच्या स्ट्रगलिंग काळाविषयी इतर स्पर्धकांना सांगताना दिसत आहे.

ठळक मुद्देमला माझ्या घराची ही परिस्थिती पाहावत नव्हती. त्यामुळे मी सकाळी भल्या पहाटे दूध आणि वर्तमानपत्र घरोघरी टाकायचे काम करू लागतो. तसेच दिवाळीत फटाक्‍याचे दुकान लावायचो.

बिग बॉस मराठी २ मधील अनेक स्पर्धक एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले असून ते आपल्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर करत आहेत. शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. सध्या तो बिग बॉस मराठीच्या घरात दिसत असून या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. शीवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शीव बिग बॉस घरातील  हिना पांचाळ आणि वैशाली माडे यांना त्‍याच्‍या जीवनातील संघर्षांबाबत सांगताना दिसत आहे. 

बिग बॉस मराठी २ च्या घरात गप्पांचा फड रंगला असताना हिना शीवला विचारते, ''लाइफमध्‍ये तू किती संघर्ष केला आहेस?'' त्यावर तो सांगतो, ''हो केला आहे... पण मला तो संघर्ष वाटला नाही... मी माझ्या आयुष्यातील तो टाइम एन्‍जॉय केला असेच मी म्हणेन...'' 

शीव त्याच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देताना म्‍हणतो, ''आमचं घर कौलाचं होतं... अतिशय छोटे असले तरी ते माझ्यासाठी खूपच सुंदर होते... पण पावसाळ्यात कौलातून पाणी गळायचं... आई अक्षरशः पाऊस पडल्यावर मी भिजू नये यासाठी भांडं पकडून बसून राहायची. मला माझ्या घराची ही परिस्थिती पाहावत नव्हती. त्यामुळे मी सकाळी भल्या पहाटे दूध आणि वर्तमानपत्र घरोघरी टाकायचे काम करू लागतो. तसेच दिवाळीत फटाक्‍याचे दुकान लावायचो. फटाक्यांची चांगली विक्री व्हायची आणि त्यातून चांगले पैसे मिळायचे... त्‍यातले काही आईला द्यायचो... उरलेल्या पैशांचे कपडे घ्‍यायचो.'' 

तो पुढे सांगतो, ''नंतर मग मी डान्‍स बघून बघून शिकलो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परफॉर्म करायला लागलो. मला शाळेत वगैरे शिकवायला बोलवायचे... त्‍याचे सुरुवातीला ७५ रुपये भेटायचे. मग हळूहळू ५००, १०००, ५०००, १०,००० मिळायला लागले. काही काळानंतर तर १५ दिवसांत मला ७५,००० रुपयांहून अधिक रक्कम मिळायला लागली. लोकांना माझं टिचिंग आवडू लागले. त्याचकाळात मी इंजिनिअरिंगला देखील प्रवेश घेतला. आता मी, ताई आणि आई आम्‍ही तिघांनी मिळून छानसं घर घेतले आहे. पप्‍पांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो.'' 

टॅग्स :बिग बॉस मराठीशीव ठाकरे