Join us  

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घराचं रुपांतर होणार एका राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:52 PM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्या पर्वातील सदस्यांची धूमधडाक्यात एंट्री झाली.

बिग बॉस मराठीमध्ये घरातील सदस्यांना एक छान सरप्राईझ मिळणार आहे. आज जुन्या आठवणी, किस्से, मैत्री आणि टास्क हे पुन्हा एकदा परत प्रेक्षकांना आठवणार आहेत... कारण आज घरामध्ये पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे तसेच रेशम टिपणीस आणि सुशांत शेलार या सदस्यांची धूमधडाक्यात एंट्री झाली. पुन्हा एकदा घरामध्ये येऊन तिघेही खूप खुश होते. या तिन्ही सदस्यांनी पहिल्या पर्वामध्ये उत्तम प्रकारे टास्क पार पाडले.

सदस्यांची जिंकण्याची जिद्द, बुध्दीचातुर्य प्रत्येक टास्कमध्ये दिसून यायचे. हे जुने सदस्य नव्या सदस्यांसोबत आज टास्क खेळणार आहेत. बघूया कोणाची टीम टास्क जिंकणार ? कसे हे जुने गाडी नव्या सदस्यांना मार्गदर्शन करणार ?

आज घरामध्ये “जुना गडी नवं राज्य” हे साप्ताहिक कार्य पार पडणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घराचे रूपांतर एका राज्यात होणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य या राज्यातील रहिवाशी असतील. राणीला किंवा राजाला जिंकून देण्यासाठी राज्यातील रहिवाशी वेळोवेळी कार्यांचा सामना करून आपल्या राणीचा किंवा राजाचा झेंडा त्या भागावर रोवतील आणि याचसोबत ते त्या भागाचे रक्षण देखील करतील. आता हे कार्य कसे रंगेल ? काय काय घडेल ? हे आजच्या भागामध्ये पहायला मिळेल.

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये म्हातारीचा बूट हे कॅप्टनसी कार्य सुरू होते परंतू शिवच्या चुकीमुळे हे कार्य स्थगित करण्यात आले.

बिग बॉस यांनी शिवला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले आणि घराचा कॅप्टन होण्याच्या शर्यती मधून बाद केले आणि त्यामुळेच किशोरी शहाणे यांनी घराचा कॅप्टन होण्याचा मान पटकवला.

टॅग्स :बिग बॉस मराठीपुष्कर जोगमेघा धाडे