Join us  

Bigg Boss Marathi 2 : गुगलवरही बिचुकलेचीच चर्चा! महेश मांजरेकर,अमोल कोल्हेंना टाकले मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:27 PM

‘बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक अभिजीत बिचुकले सध्या जाम चर्चेत आहे. इतका की, त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले आहे.

ठळक मुद्देअभिजीत बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आले होते.

बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक अभिजीत बिचुकले सध्या जाम चर्चेत आहे. इतका की, त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले आहे. होय, अलीकडे चेक बाऊन्स आणि खंडणीप्रकरणी त्याला झालेली अटक त्याच्या पथ्यावर पडली.एकमेव राजकीय नेता म्हणून अभिजीत बिचुकलेने ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या आठवड्यात घरातील सर्व स्पर्धकांनी बिचुकलेला टार्गेट केले. पण  बिचकुले घरातील सगळ्यांना पुरून उरला. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर आणि त्याची भांडणे सगळेच चर्चेचा विषय ठरले.

‘बिग बॉस मराठी 2’ रंगात आला असताना गत २१ जूनला बिचुकलेला अटक झाली. सातारा पोलिसांनी एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याला बिग बॉसच्या घरातून  अटक केली.   त्यानंतर एका खंडणी प्रकरणातही त्याच्यावर अटकेची कारवाई झाली. पण अटकेची ही कारवाई बिचुकलेच्या चांगल्याच पथ्यावर पडली. इतकी की, गुगलवर अभिजीत बिचुकलेचा सर्च वाढला आहे.  सर्चच्या बाबतीत त्याने ‘बिग बॉस मराठी 2’चे होस्ट महेश मांजरेकर यांनाही मागे टाकले.

गुगल ट्रेण्डसच्या गत सात दिवसांच्या क्रमवारीत बिचुकलेचा सर्च वाढल्याचे दिसले. २१ जून म्हणजे, ज्या दिवशी त्याला अटक झाली, त्यादिवशी अभिजीत बिचकुले हे नाव सर्वाधिक सर्च केल्या गेले. सर्चच्या या शर्यतीत महेश मांजरेकर आणि अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनाही त्याने मागे टाकले.अभिजीत बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आले होते. अभिजीतवर चेक बाऊन्स आणि खंडणी असे दोन गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला जामीन मिळाला होता. पण खंडणी प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण आता ही तक्रार मागे घेण्यात आली आहे.

 खंडणी प्रकरणातील तक्रारदार फिरोज पठाण यांनी खंडणीसंदर्भातील तक्रार मागे घेण्याबाबत सोमवारी सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर आणि बिचुकले याच्या जामीनाच्या अर्जावर उद्या गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच बिचुकले कारागृहातून बाहेर येणार का आणि मग बिग बॉसच्या घरात जाणार का या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

टॅग्स :अभिजीत बिचुकलेबिग बॉस मराठी