Join us

बिग बॉसच्या घरात 'या' जोडीची सुरू झाली लव्हस्टोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 14:36 IST

बिग बॉसच्या घरात आता पर्यंत अनेक प्रेम कहानी बहरतांना आपण पाहिल्यात. ज्यात कोणतीही लव्हस्टोरी नाही फुलणार  ते बिग बॉसचे ...

बिग बॉसच्या घरात आता पर्यंत अनेक प्रेम कहानी बहरतांना आपण पाहिल्यात. ज्यात कोणतीही लव्हस्टोरी नाही फुलणार  ते बिग बॉसचे घर कसले.म्हणूनच बिग बॉसच्या याधीच्या पर्वात अनेक लव्हस्टोरी पाहायला मिळाल्या. यंदाही बिग बॉसच्या 10व्या सिझनमध्येही अशाच काही लव्हस्टोरी घडल्यात आणि घडतायेत. सगळ्यात आधी शोच्या सुरूवातील मनु पंजाबीसह मोनालिसाची जोडी चर्चेचा विषय ठरली. मोनालिसा आणि मनु पंजाबी दोघांची वाढती जवळीक पाहता त्यांच्यात काही तरी शिजत असल्याच्या चर्चा रंगल्या इतकेच नाही तर मोनाने मनुला किस केल्यामुळे दोघांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. काही कारणांमुळे मनु पंजाबीला बिग बॉसच्या घराबाहेर यावे लागले. त्याचदरम्यान मोनालिसाने आपला मोर्चा गौरव चोपडाकडे वळवतांना दिसला. अचानक मनुच्या प्रेमात बुडालेली मनुला आता गौरवची मैत्री आवडु लागली.या जोडीनंतर आता पुन्हा एक जोडी चर्चेत आली आहे. कारण बिग बॉसच्या घराती पुन्हा एकदा फ्रेश लव्हस्टोरीला सुरूवात झाली आहे.ती म्हणजे कॉमनर्समधले स्पर्धक नितीभा आणि मनवीर या दोघांमध्ये इलुइलु सुरू झाल्याचे गेल्या काही भागांमध्ये दिसून येतेय.काही दिवसांपूर्वीच हे दोघेही एकत्र बेडवर झोपतात त्यामुळे घरातही इतर स्पर्धक मनवीर आणि नितीभा यांच्यावरच चर्चा करत असतात. एकुणच या बिग बॉसच्या घरात नई लव्हस्टोरी शुरू हो गई मामु असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.बिग बॉसच्या सुरूवातीच्या भागात मनु मनवीर आणि मोनलिसा यां तिघांना सोडले तर दुसरे कोणीही जास्त जवळ अाल्याचे पाहयला नव्हते मिळाले. त्यात नितीभाही कॉमनर्सटीममधली असूनही तीची जास्त कोणाशी मैत्री झाल्याचे पाहायला नाही मिळाले. त्यात नितीभाही सेलिब्रेटी नसूनही स्वतः सेलिब्रेटी असल्यासारखीच घरात वावरत असल्याचे मनवीरनेच म्हटले होते. काही दिवसांपूर्जीवी जी  स्पर्धकशी मनुचा कोणत्याही गोष्टीशी मेळ होत नव्हता तीच नितीभा आता मनुची दिल की धडकन बनताना दिसतेय.